महाबळेश्वर

राजेंद्र शेठ राजपुरे यांना महामंडळ मिळावे, कार्यकर्त्यांची अपेक्षा; महाबळेश्वर तालुक्यातून जोरदार पाठिंबा

प्रतापगड वार्ताहर(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यात निष्ठेने कार्यरत असलेल्या राजेंद्र शेठ राजपुरे यांना आगामी काळात कोणत्याही महामंडळावर नियुक्ती मिळावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.वाई, खंडाळा, महाबळेश्वर व जावली या चार तालुक्यांमध्ये जनतेशी थेट संवाद साधून लोकहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात राजपुरे यांचा मोलाचा वाटा आहे. महाबळेश्वर सारख्या भौगोलिकदृष्ट्या अवघड तालुक्यात त्यांचे कार्य विशेषत्वाने अधोरेखित होते.राजेंद्र शेठ हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून त्यांनी युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी अनेक प्रशिक्षण उपक्रम राबवले. विशेषतः महाबळेश्वर तालुक्यातील स्टॉबेरी शेतीला आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आधार देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्येही त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्व. बाळासाहेब भिलारे यांच्यानंतर तालुक्यातील प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा नेता म्हणून राजपुरे यांची ओळख बनली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन समस्या जाणून घेणे व त्या मार्गी लावणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य राहिले आहे.स्थानिक युवा नेते संतोष जाधव यांनी सांगितले की, “महाबळेश्वर तालुक्याला राजकीय संधींची नेहमीच कमतरता राहिली आहे. येथे केवळ दोन जिल्हा परिषद सदस्य, चार पंचायत समिती सदस्य आणि एक जिल्हा बँकेचा संचालक अशी मर्यादित राजकीय प्रतिनिधित्वाची साधने आहेत. त्यामुळे जर यावेळी राजेंद्र शेठ राजपुरे यांना महामंडळावर स्थान मिळाले, तर हे तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद ठरेल.”मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राजपुरे यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा वाढल्या असून, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना अधिक जबाबदारी दिली जावी, ही स्थानिक कार्यकर्त्यांची ठाम मागणी आहे.

महाबळेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य.युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम.
कृषी सहकार्याद्वारे स्ट्रॉबेरी उत्पादनात वाढ.
प्रत्येक गावात जाऊन जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न.स्थानिक कार्यकर्त्यांकडून महामंडळावर वर्णी लागावी अशी मागणी.
राजेंद्र शेठ राजपुरे यांना महामंडळावर संधी मिळाल्यास, महाबळेश्वर सारख्या दुर्गम तालुक्यातील जनतेला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button