मेढा

जयश्रीताई म्हणजे गोरगरीब जनतेची माई

कुडाळ गटात फुलणार कमळ

मेढा – ( सोमनाथ साखरे ) – माजी सभापती सुहास गिरी आणि माजी सभापती सौ. जयश्रीताई गिरी यांना पंचायत समिती मध्ये पाठविण्याचा विक्रम करणाऱ्या कुडाळ गटातील मतदारांनी आता जिल्हा परिषदेत मोठ्या मताधिक्यांनी सौ. जयश्रीताईंना विजयी करण्याचा निर्धार केला असल्याने जयश्रीताई म्हणजे जनतेची माई जिल्हा परिषदेत दिसणार असुन कुडाळ गटामध्ये कमळ फुलणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
सलग दोन टर्म पंचायत समितीच्या या ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले ( बाबाराजे ) यांच्या माध्यमातुन जनतेची सेवा करण्याची संधी गिरी दापत्यास मिळाली होती. या दहा वर्षाच्या कार्यकाळात सुहास गिरी आणि सौ.जयश्रीताई गिरी यांनी जनतेच्या विश्वासास पात्र राहुन अनेक विकास कामे केली. त्यामुळे आजही कुडाळ गटातील जनता गिरी कुटुंबीयांच्या पाठीशी उभी आहे.
सांप्रदायिकते मध्ये असणारे गिरी कुटुंबीय समाजकार्यातही अग्रेसर आहेत. त्यामुळे जनतेचे प्रेम कायमच त्यांच्या पाठीशी उभे राहीलेले आपल्याला नेहमी दिसुन येते. त्यामुळे कुडाळ गटामधील भाजपचे उमेदवार सौ. जयश्रीताई सुहास गिरी , कुडाळ गणाचे उमेदवार सौरभ शिंदे तसेच सायगाव गणाचे उमेदवार चारुशिला पवार यांना नंबर एकचे मतदान घेवुन विजयी करण्यासाठी कमळा चिन्हा समोरील बटण दाबण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button