भिलार

भिलार बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा ‘झंझावात’; वंदना भिलारे यांच्या रॅलीला जनसागराचा प्रतिसाद, विरोधक बॅकफूटवर

भिलार (प्रतिनिधी):
‘पुस्तकाचे गाव’ म्हणून जागतिक ख्याती असलेल्या भिलारमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण पाहायला मिळत आहे. पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. वंदना भिलारे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला भिलारकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ‘आबांचा शब्द आणि दादांचा वारसा’ घेऊन निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसरात विजयाचा विश्वास निर्माण केला असून, विरोधकांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता पसरली आहे.
​राजकीय रॅलीला लाभले कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप
​या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांची विक्रमी उपस्थिती. राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि वंदनाताईंबद्दल असलेला जिव्हाळा यामुळे महिला वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. ठिकठिकाणी माता-भगिनींनी वंदनाताईंचे औक्षण करून त्यांना विजयाचा टिळा लावला. ही केवळ एक राजकीय रॅली न राहता, तिला एखाद्या कौटुंबिक सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
​विरोधकांचा समाचार आणि विकासाचा ‘मकरंद’ पॅटर्न
​रॅलीच्या निमित्ताने आयोजित सभेत जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “या भागाचा कायापालट कोणी केला, हे इथल्या सुज्ञ जनतेला ठाऊक आहे. मकरंद आबांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. विरोधक केवळ निवडणुकीपुरते प्रकट होतात, पण आम्ही २४ तास जनतेच्या सेवेत असतो.”
​बाळासाहेबांचा वारसा आणि राजपुरे यांचे नेतृत्व
​भिलार हा भाग स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या काळापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर राजेंद्रशेठ राजपुरे यांनी ही राजकीय धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे. ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता’ या धोरणामुळे राष्ट्रवादीची फळी वाडीवस्तीवर सक्रिय झाली असून, हा संघटनात्मक पायाच वंदना भिलारे यांची खरी ताकद ठरत आहे.

​भिलार गणातून पहिल्यांदाच एक कर्तबगार महिला उमेदवार निवडणूक लढवत असल्याने मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे.
​मंत्री मकरंद पाटील यांनी आपत्ती काळात केलेली धाडसी मदत आणि कार्यकर्त्यांना दिलेले बळ मतदारांच्या स्मरणात आहे.
​विकासाचे व्हिजन: पर्यटन विकास, सुसज्ज रस्ते आणि स्थानिक रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी वंदनाताईंनी दिलेला शब्द मतदारांना भावला आहे.
​तरुण वर्ग, शेतकरी आणि महिला अशा सर्वच स्तरांतून वंदना भिलारे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. विजयाचा हा वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी भिलारकर पुन्हा एकदा घड्याळाचा गजर करणार, असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button