भिलार

भिलार येथे श्रीराम जन्मोत्सव व अखंड हरिनाम दिंडी सोहळ्याचे आयोजन

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क):
पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार येथे ‘श्रीराम कला क्रीडा मंडळ’ संचलित ‘ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण’, ‘अखंड हरिनाम दिंडी सोहळा’ आणि ‘श्रीराम जन्मोत्सव’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ ते शुक्रवार, २७ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
​वैकुंठवासी ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज यांच्या भक्ती पंथावर मार्गक्रमण करत ह.भ.प. कृष्णा तात्याबा मोरे (मामा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा २८ वा वर्षोत्सव साजरा होत आहे.
​कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी सकाळी ८ वाजता महारुद्र अभिषेक व धार्मिक विधींनी होईल. त्यानंतर कलशपूजन, व्यासपीठ पूजन आणि दुपारी १२ वाजता मुख्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडेल. दुपारी सत्यनारायण महापूजा व सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन होईल.
​गुरुवारी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. ऋषीकेश महाराज दरेकर गुरुजी यांच्या शिष्यांचे सामूहिक पखवाज वादन होणार असून, त्यानंतर रात्री ७ ते ९ या वेळेत राष्ट्रीय शिवकीर्तनकार ह.भ.प. डॉ. गणेश महाराज वाळूंज (श्री टाळमृदंग कला केंद्र, पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
​रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रम
​भक्तीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने गुरुवारी सकाळी १० ते १ या वेळेत ‘भव्य रक्तदान शिबिराचे’ आयोजन केले आहे. तसेच, शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
​शुक्रवारी सकाळी काकड आरती, भजन आणि सकाळी ११ वाजता ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी १:३० वाजता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल.
​या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ भिलार आणि श्रीराम कला क्रीडा मंडळ, भिलार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button