Uncategorizedमेढा

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या झंझावतापुढे विरोधक टिकणार का ? केळघर आणि कुडाळ येथे आज जाहीर सभा

मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)सातार जावलीचे लोकप्रिय आ. तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची कुसुंबी गटाच्या उमेदवार सौ. अर्चना रांजणे आणि कुडाळ गटाच्या उमेदवार सौ. जयश्रीताई गिरी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत असल्याने ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या झंझावाता पुढे विरोधकांचा टिकाव लागणार का? असे चित्र सध्या दिसुन येत आहे.
जावली तालुकाचे लाडके लोकप्रिय ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली तालुक्यात खेडोपाड्यातील वाडी वस्त्यावर विकासाची गंगा पोहचवली असून बोडारवाडी धरणाचा हाती घेतल्याने जावलीतील मतदार हा त्यांनी कुसुंबी गटासाठी दिलेल्या भाजपच्या उमेदवार सौ. अर्चना रांजणे तसेच कुडाळ गटातील दिलेल्या भाजपच्या उमेदवार सौ. जयश्रीताई गिरी यांचा पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असतानाच गणांचे उमेदवारही प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


आज बुधवार दि. ४ रोजी केळघर येथे दुपारी ४ वाजता तर कुडाळ येथे सायंकाळी ६ वा सार्वजनिक मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होत आहे. ना. भोसले यांच्या प्रचार दौर्‍यामुळे प्रत्येक गावावात नवचैतन्य निर्माण झाले आहे. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विकासभिमुख दृष्टी कोणामुळे . मतदार हा बाबाराजेंच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे विरोधक मतदारांच्या पसंतीला किती उतरतात हे आजच्या सभेने सिद्ध होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button