कमळाला मत म्हणजे बाबाराजेंना मत मतदारांचा कमळ चिन्हावर विश्वास



मेढा –सोमनाथ साखरे(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) जिल्हा परिषद कुसुंबी गटामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना जोरदार टक्कर पहायला मिळत असताना कुसुंबी गटातील मतदार बाबाराजेंच्या ठाम पाठीशी उभा राहीला असल्याने कमळाला मत म्हणजे बाबाराजेंना मत असा विश्वास मतदारांच्यात निर्माण झाला आहे.
जावली तालुक्यातील जनता नेहमी विकासाच्या मागे उभी राहीली असून ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी राहीली आहे. बाबा राजेंनी हाक दिली असता हाकेला साथ देणारी जनाता असुन नेहमीच मतदानातुन ते सिद्ध करून दाखविते. सामान्य जनतेच्या हृदयात राज्य करणारे बाबाराजे यांचे हात बळकट करणासाठी जिल्हा परिषद कुसुंबी गटातील उमेदवार सौ. अर्चना ज्ञानदेव रांजणे तसेच गणांचे उमेदवार विजय सपकाळ व सौ. पुष्पा चिकणे याच्या नावासमोरील कमळ बटण दाबुन मतदार बाबाराजेंचा विश्वास संपादन करणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे.सध्या कुसुंबी गटामध्ये भाजपचे वारे वाहत असुन कमळाला मतदारांची पसंती असल्याचे चित्र दिसुन येत आहे.