कुसुंबी गटात अर्चना रांजणेंचा विजय निश्चित

मेढा -(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क सोमनाथ साखरे ) जिल्हा परिषद कुसुंबी गटामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु असून भाजपा व शिवसेने मध्ये काटे की टक्कर पहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदार संघातील विकास कामांमुळे भाजप चे कमळ घरा घरात पोहचले असल्यामुळे कुसुंबी गटात भाजपचे गटाचे उमेदवार सौ. अर्चना रांजणे तसेच गणांचे विजय सपकाळ आणि सौ. पुष्पा चिकणे यांचा विजय निश्चित समजला जात आहे.

जावली तालुक्यावर विकास कामांमुळे भारतीय जनता पक्षाने आपली पकड मजबुत केली आहे. डोंगर माथ्यावरील प्रत्येक गाव शहराशी जोडण्यासाठी रस्ते निर्माण केले असल्याने तसेच वीज, पाणी योजना गावो गावी पोहचल्यामुळे जनेतची ना. शिवेंद्रसिंहराजे उर्फ बाबाराजे यांचेशी जोडली गेली असल्याने त्याचा फायदा कुसुंबी गटासाठी भाजपच्या उमेदवार अर्चना रांजणे व गणाचे उमेदवार विजय सपकाळ व पुष्पा चिकणे यांना होणार आहे.
मतदानाचे दिवस जसे जसे जवळ येवु लागले आहेत तशी प्रचाराची रंगत वाढु लागली आहे. विरोधकांच्या भुल थापांना जनता बळी पडणार नसल्याचा विश्वास भाजपच्या उमेदवारांना असल्याने गटामध्ये कमळ फुलणार असल्याचे सामान्य मतदारातुन बोलले जात आहे.
.