प्रशासकीय कौशल्याचा गौरव: शंकरराव चिकटूळ यांना राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार प्रदान

पुणे: (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी व गुणवंत कर्मचारी पुरस्कार सोहळा पुणे येथे उत्साहात पार पडला. कृषी महाविद्यालय, पुणे येथील मैदानावर संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात महाबळेश्वर व वाई पंचायत समितीमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे श्री. शंकरराव चिकटूळ यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते आणि खा. मेधा कुलकर्णी, अभिनेत्री शिवाली परब, आ. शंकर मांडेकर, आ. बापूसाहेब पठारे, अपर आयुक्त नितीन माने व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.
श्री. चिकटूळ यांनी महाबळेश्वर पंचायत समितीमध्ये १९ वर्षे ६ महिने सेवा बजावली असून, सध्या ते वाई पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. २००५ च्या बॅचचे नेतृत्व करणारे ‘संघर्ष योद्धा’ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रामपंचायतींनी
•निर्मल ग्राम पुरस्कार (२००५-०६)
•स्मार्ट ग्राम व स्वच्छ ग्राम पुरस्कार
•ISO मानांकन प्राप्त ग्रामपंचायती
•दीनदयाळ पंचायत पुरस्कार आणि पर्यावरण ग्राम पुरस्कार
केवळ प्रशासकीय कामच नव्हे, तर अभ्यासू वृत्ती आणि पारदर्शक कारभारामुळे चिकटूळ यांनी आजवर वैयक्तिक पातळीवर ४० हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल यापूर्वी DRDO आणि पंचायत राज समितीनेही घेतली आहे. जिल्हास्तरीय आणि विभागीय पुरस्कारांनंतर आता राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या कार्यक्रमाला पुणे जिल्हा व राज्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. चिकटूळ यांच्या या यशामुळे महसूल व ग्रामविकास विभागात त्यांचे कौतुक होत आहे.
