महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी – राजेंद्रशेठ राजपूरे
पांगारीत महिलांच्या मोफत टेलरींग कोर्सचे उद्घाटन


पाचगणी (टीम कृष्णकुंज नेटवर्क ) – महिलांनी गावाचा विकास साधण्यासाठी तसेच गावात नवीन उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी जी पण मदत लागेल त्यासाठी आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहु. माननीय ना. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करण्याचे काम करत असतो. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिलांनी व्यवसायाकडे वळावे आणि आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन राजुशेठ राजपूरे यांनी केले.
स्मार्ट ग्रामपंचायत पांगारी येथे नॅशनल फॅशन टेलरिंग कोर्स तर्फे गावात मोफत टेलरिंग कोर्स चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत टेलरिंग शिक्षण कोर्सचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे याचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी शशिकांत भिलारे (बापू), कॉन्ट्रॅक्टर राम गोळे, ऍडव्होकेट संग्राम पवार, माजी सरपंच जाणू पांगारे, सदस्य मंगल पांगारे,जेष्ठ रखमाजी पांगारे बाबा, योगेश पांगारे,बचत गट महिला, ग्रामस्थ,व नॅशनल फॅशन टेलरिंग संचालक महादेव भिलारे , वंदना भिलारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पांगारे यांनी केले तर उपस्थित्यांचे आभार जाणू पांगारे यांनी मानले.
