वाई

सातारा पुणे महामार्गावर पाचवड गावच्या हद्दीत इनोव्हा कार चालकाचा ताबा सुटल्याने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या भिषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी .

वाई (टीम कृष्णकुंज नेटवर्क)
सातारा पुणे महामार्गावर पाचवड या.वाई गावच्या हद्दीत इनोव्हा कारला झालेल्या भिषण अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर दोन गंभीर जखमी झाले आहेत . जखमींना तातडीने  पोलिस व नागरिकांच्या मदतीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
हा अपघात एवढा भिषण होता कि कारचा. चक्काचूर झाला आहे .सलमा इरफान मोमीन वय ४० राहणार सांगली .आणी नहीदा समीर शेख वय ३९ राहणार शनिवार पेठ सातारा अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत .भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी दिलेली माहिती अशी की सलमा इरफान मोमीन वय ४० राहणार सांगली नहीदा समीर शेख वय ३९ राहणार शनिवार पेठ सातारा ‌ बशीर महम्मद पठाण वय ७३ राहणार शनिवार पेठ सातारा . सलमान रफिक पठाण वय २७ राहणार जवळवाडी ता.मेढा .असे चौघेजण येणाऱ्या ईदच्या सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्या साठी सातारहुन इनोव्हा कार क्रमांक एम .एच .११ बिग .के .१५६७ मधुन सातारा पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने. रविवार दि .९ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जात असताना त्यांची कार भरघाव वेगात पाचवड  ता . वाई गावच्या हद्दीत ९ .४ ० वाजता आली त्यावेळी महामार्गावर त्यांच्या समोर नादुरुस्त एक लांबलचक असणारा कंटेनर बंद अवस्थेत उभा होता तो कार चालकाने पाहताच त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरघाव वेगात असणाऱ्या कारने पाठीमागून उभ्या कंटेनरला जोराची धडक दिल्याने कारमधील सर्वजण बाहेर फेकले गेले .हि धडक एवढी भिषण होती‌ कि. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह एक जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात घडल्या ‌वेळे प्रसंगी वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम हे सातारहुन परेट उरकून वाईच्या दिशेने जात असताना या भिषण अपघातातील मयत आणी जखमी महामार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पहाताच त्यांनी स्वताची गाडी थांबवली ‌व अपघात स्थळाची पाहणी करून भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना घडल्या अपघाताची माहिती दिली.या गंभीर अपघाताची माहिती सपोनी रमेश गर्जे यांना समजताच पी एस आय शिंदे हवालदार शिवाजी तोडरमल . दगडे .भोसले .या सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटना स्थळावर दाखल होऊन तात्काळ रुग्ण वाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहे .याचा पुढील तपास सपोनी रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करित आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button