वाई

आमच्या हक्काच पाणी कुणी पळवल? पुरुषोत्तम जाधव यांचा सवाल*

वाई (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क )वाई  तालुक्यात दोन दोन धरणे असताना १५ वर्षे संधी दिलेल्या आमदाराच्या निष्क्रियतेमुळे आपल्याच तालुक्याचे हक्काचे पाणी दुसरीकडे गेलेच कसे ? यावेळी आपण काय करीत होता? वाई तालुक्यातील पूर्व भागातील ३४ हून अधिक गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत कुणी पळवल असा सवाल वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव  वाई तालुक्यातील चांदक येथील कोपरासभेत व्यक्त केला. पुढे पुरुषोत्तम जाधव म्हणाले,  वाई,खंडाळा तालुका दुष्काळी जाहीर करावा लागतो हे त्यांचे अपयश आहे पण विशेष प्रयत्नातून वाई तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करून घेतला म्हणून आनंद साजरा करणारा देशातील पहिला आमदार आपल्या मतदार संघाला लाभला

कवठे केंजळ पाणी प्रकल्पावर जनतेतून मोठा रोष

तीन टर्म आमदारकी भोगलेल्यानी पाणी आणल रस्ते आणले असे म्हणत प्रचार करायला गेलेल्या लाभ नायक आमदाराच्या प्रचारकांना काल परवाच केंजळ येथे जनतेच्या शाब्दिक रोषाला तोंड देता देता पळता भुई थोडी झाल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्यामुळे मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.

हे मतदार संघाचे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे.तीन टर्म सत्ता भोगुनही कुचकामी ठरलेल्या आमदारांकडून साडे चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणून प्रचार सुरू आहे.

पण मतदार संघातील मूलभूत समस्या त्याच आहेत.दोन दोन धरणे असलेल्या वाई तालुक्यात ५० वर्षे दुष्काळी राहिलेल्या वासोळे ते वेळे पर्यंतच्या ४०गावांना पाणी पोहोचवून पाणीदार केले असते आणि ४० गावे दुष्काळ मुक्त केली म्हणून आनंद साजरा केला असता तर आम्ही सुद्धा नक्कीच कौतुक केले असते.परंतु दुर्दैवाने हे विद्यमान आमदारांना अपयश आहे.खोटं बोल पण रेटून बोल हा फॉर्म्युला यंदा चालणार नाही हाच संदेश मतदार बांधवांनी लाभनायक आमदाराला दिला आहे. खंडाळा तालुक्याच्या पाणी प्रश्नाचा पुळका आलेल्या विद्यमान आमदारांना गेल्या पंचवीस वर्षात पाणी प्रश्न का सोडवता आला आहे नाही? खंडाळा तालुक्याचा फक्त मतापुरता वापर करणाऱ्या मूकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या. वडील १०वर्षे खासदार हे १५ वर्षे आमदार अशी २५वर्षे सत्ता घरात असूनही यांना वाई तालुक्यातील कवठे केंजळ योजना देखील पूर्ण करता आली नाही .वाई शहराला भेडसावणारा पार्किंग चा प्रश्न सोडवता आला नाही.ज्या किसनवीर आबांच्या नावाने राजकारण करतायत त्यांचे स्मारक अद्याप धूळखात पडलेय ते सुशोभित करता आले नाही.पाण्याची एक थेंबही तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही याची आठवण झाली मग १५वर्षे काय केले? असा थेट सवाल वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदारांना केला आहे.

पुरुषोत्तम जाधव यांच्या  पुरुषोत्तम जाधव यांनी वाई तालुक्यातील वेळे गुळुंब, केंजळ ,चांदक, आनंदपुर, मुंगसेवाडी ,सटालेवाडी, परखंदी, सुलतानपूर ,लोहारे ,बोपर्डे ,धावडी ,गुंडेवाडी ,कोचलेवाडी ,मांढरदेव, बालेघर ,वेरूळी  या गावात प्रचार दौरा केला या गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या व परिवर्तनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button