

मेढा(टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क)- सातारा जावली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचार रॅलीमध्ये स्वयंमस्फुर्तीने जावलीची जनता सहभागी होत असून जावली करांच्या वतीने बाबाराजेंना जनतेचा उत्स्फुर्त पाठींबा मिळत असल्याचे चित्र बाजारापेठेतून काढलेल्या प्रचार फेरीतुन दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार छ. शिवेंद्रसिंहराजे ( बाबाराजे ) भोसले यांनी जावली तालुक्यातील अनेक गावे, वाडीवस्ती मध्ये भेटी देत जावलीतील जनतेचा आशिर्वाद घेण्याचे सत्र सुरु केले असताना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील वाडीवस्तीवर महायुतीच्या उमेदवाराचे कमळाचे चिन्ह पोहचविण्यासाठी कार्यकर्ते कामला लागले आहेत. महायुतीचे उमेदवार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासाची गंगा तालुक्यात आणून अनेक गावांचे अनेक दिवस प्रलंबीत प्रश्न, विकास कामे मार्गी लावण्याचे काम केले असल्याने जावलीकर पुन्हा एकदा बाबाराजेंवर विश्वास टाकण्यासारखे चित्र सध्या दिसून येत आहे. मेढा येथिल बाजारपेठेतुन महायुतीचे उमेदवार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचार फेरी काढली असताना या फेरीमध्ये शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते तर व्यापारी वर्ग छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वागत करीत होते.