मेढा

शिवसेना अभेद्य राहण्यासाठी माझी उमेदवारी माघार – एस एस पार्टे

शिवसेना ( उबाठा ) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत करताना एस एस पार्टे, विश्वनाथ धनावडे आदी ( सोमनाथ साखरे )

मेढा (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क ) महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होऊ नये आणि शिवेना अभेद्य राहावी याकरिता पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उ‌द्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने पक्षहित नजरेसमोर ठेऊन स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या आवाहनाशी प्रामाणिक राहात मी माझा उमे‌द्वारी अर्ज मागे घेताना यापुढे ही कायम माझ्या पक्षासोबतच निष्ठापूर्वक राहण्याचा निर्धार केला आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सातारा जावली विधानसभा क्षेत्रप्रमुख एस एस पार्टे यांनी सांगीतले.ते प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हणातात की, मी १९७७ सालापासून शिवसेना पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. वेळोवेळी पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम केले आहे. मी स्वतः महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडनुकी करिता सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून माझ्या पक्षातून इच्छुक होतो. तशी तयारीही केली होती. परंतू पक्षाने (महाविकास आघाडीने) अमित कदम यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.ते पुढे म्हणतात अपक्ष उमेदवारी मागे घेण्याकरिता शिवसेना नेते विनायक जी राऊत, अनिलजी परब, उपनेते तथा संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रा.नितीन बानुगडे पाटील, समन्वयक प्रश्चिम महाराष्ट्र दगडू दादा सपकाळ यांनी विशेष प्रयत्न केले. त्याब‌द्दल मी त्यांचा ऋणी आहे. पक्षप्रमुख मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रत्नागीरी येथे भेट देऊन माझी आस्थेवाईकपणे विचारपूस केली त्याब‌द्दल त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करताना यापुढेही शेवटच्या श्वासापर्यंत स्वर्गीय हिंदूहृदयसमाट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक राहण्याचा निर्धार व्यक्त करीत आहे. सातारा जावली विधान सभा मतदार संघातील मतदारांनी मशाल चिन्हां समोरील बटन दाबून महाविकास आघाडीचे उमे‌द्वार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button