पांचगणी

शाहू ,फुले, आंबेडकरांचा विचार कधीही सोडला नाही. : आ. मकरंद आबा पाटील ; पाचगणीतील मुस्लिम बांधवांचा मकरंद आबा पाटील यांना पाठिंबा

पांचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)पांचगणी हे सर्वधर्म संमभावाच शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या सामाजिक व  राजकिय कारकीर्दीत आम्ही शाहू ,फुले, आंबेडकरांचा विचार कधीही सोडला नाही. आजही जातीपातीपेक्षा समाज आणि त्यांचे प्रश्न याला कायम प्राधान्य देतो आहोत. मुस्लिम समाजाशी आपले असलेले नाते अधिक दृढ करण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या समाजाच्या कुठल्याही प्रश्नासाठी मी कधीही मागे राहणार नसल्याचा शब्द आज आ. मकरंद आबा पाटील यांनी दिला. वाई – खंडाळा – महाबळेश्वर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मकरंद आबा पाटील यांनी पांचगणी येथील मुस्लिम समाजाशी संवाद साधला. यावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर कासूर्डे, शरद कासूर्डे ,  माजी नगरसेवक नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, मिलिंद कासूर्डे, अजित कासूर्डे, राजेंद्र पार्टे, राजेश पार्टे , निसार सय्यद , लाला बागवान, नियाज चौधरी, मौलाना मासूम अली , नौशाद सय्यद, शाहनवाज चौधरी,  बशीर मोमीन, जाफर चौधरी तसेच मुस्लिम युवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. पाटील पुढे म्हणाले पांचगणीसह महाबळेश्वर , खंडाळा , वाई या तालुक्यांशी आमच्या कुटुंबाचा फार मोठा ऋणानुबंध आहे. मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नासाठी मी मोठे योगदान दिले आहे. याची तुम्ही खात्री करा. महायुतीत जाताना मी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी मंत्रिपदाचा आग्रह सोडून कारखान्यांना साठी निर्णय घेतला. जर मी विरोधात राहून शेतकऱ्यांना न्याय देवू शकत नसेल तर तिथे राहून काय उपयोग ?  यासाठी नाईलाजास्तव मला निर्णय घ्यावे लागले. तरीसुध्दा मी तुम्हाला सांगतो मी राष्ट्रवादीतून निवडणूक लढत आहे त्यामुळे पुढच्या सेवेसाठी मला पाठिंबा द्यावा असे सांगितले.मकरंद आबा पाटील यांनी आजपर्यंतच्या कारकीर्दीत  सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला त्यामुळेच त्यांना अनेक पद मिळत गेली आहेत. आपल्या प्रश्नांची जाण असणारा, कधीही थेट भेटत सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपण मकरंद आबा पाटील यांच्या पाठीशी आपल्या समाजाची ताकद उभी करावी असे यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी सांगितले. यावेळी आमच्या समाजाच्या पाठीशी कायम राहणाऱ्या मकरंद आबा यांच्या पाठीशी आम्ही सर्व समाजबांधव आमची ताकद १०० टक्के उभी करू असा विश्वास यावेळी माजी नगरसेवक निसार सय्यद यांनी दिला.लाला बागवान यांनी आभार मानले 

पांचगणी येथे मुस्लिम समाजाची मोठी संख्या असल्याने काल रात्री उशिरा शहरातील मशिदी मध्ये जाऊन समाजातील कार्यकर्त्यांशी आबांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर युवकांशी चर्चा केली. यावेळी सर्वांनी आबाना निवडून आणण्याचा निर्धार केला. विरोधक काहीही सांगतील, त्यांच्या भूलथापांना बळी न पडता तुम्ही योग्य निर्णय घ्यावा असे यावेळी आबांनी सांगितले.पांचगणी येथे मुस्लिम समाजाची मोठी संख्या असल्याने काल रात्री उशिरा शहरातील मशिदी मध्ये जाऊन समाजातील कार्यकर्त्यांशी आबांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर युवकांशी चर्चा केली. यावेळी सर्वांनी आबाना निवडून आणण्याचा निर्धार केला. विरोधक काहीही सांगतील, त्यांच्या भूलथापांना बळी न पडता तुम्ही योग्य निर्णय घ्यावा असे यावेळी आबांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button