मेढा

सरपंच संतोष देशमुखच्या हत्याने जावळी हळहळली

मुक मोर्चाने तहसिलदारांना आरोपींच्या फाशीचे दिले निवेदन

बिडच्या घटणेच्या निषेधार्थ मेढ्यात काढण्यात आलेला मुक मोर्चा ( सोमनाथ साखरे )

मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर समाजमन हेलावून गेले आहे. या हत्याकाडांतील सहभागी आरोपींनी ज्या पध्दतीने मारहाण केली. त्यांच्या देहाची विटंबना केली हे दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटो वरून दिसून येत आहे. यापूर्वीही माध्यमांवर अनेक प्रकारच्या मारहाणीच्या व्हिडीवो व फोटो समाजाने पाहिले आहेत. एखाद्या जनावरालाही अशा पध्दतीने मारले जात नाही अशा पध्दतीने या सर्व नराधमांनी सरपंच संतोष देशमुख यांना मारलेले असल्यामुळे जावली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात आरोपींच्या मागे कितीही मोठा हात असला तरी हे आरोपी वाचता कामा नयेत असे नमुद करून या हत्येतील सर्व आरोपी ज्या पध्दतीने वागले त्याचे फोटो,व्हिडीवो काढले त्याचा अर्थ ते इतके निर्ढावलेले आहेत की,त्यांच्या मनात कायद्याची भीती नव्हती असेच दिसून येते.त्यामुळे अशा मस्तवाल,निर्ढावलेल्या गुन्हेगारांना फाशीची आणि फाशीचीच शिक्षा व्हायला हवी अशी जोरदार मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे कणखर गृहमंत्री आहेत. त्यांनी पोलिस प्रशासनाला सक्त सुचना देवून एकही छोट्यात छोटा पुरावा सुटणार नाही आणि या गुन्ह्यातील एकही आरोपी सबळ पुराव्या अभावी सुटणार याची दक्षता घ्यावी असे आवाहन करून अमानवी पध्दतीने मारहाण करून हत्या करणार्‍या सर्व आरोपींना व त्यांच्या पाठिराख्यांना फाशीची शिक्षाच व्हायला हवी हीच समाजभावना आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात स्व.संतोष देशमुख हे गरीब कुटुंबातील असून त्यांचा परिवार उघडा पडता कामा नये यासाठी सरकारने या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करायला हवी. स्व.संतोष देशमुख यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी अशी मागणी करण्यात आली आहे. आपल्या राज्यात अशा घटना घडतात हेच मुळी संतापजनक व दुर्देवी आहे.
वरील घटनेतील सर्व आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न करावेत हिच आमची जावळीतील जनतेची विनंती आहे असे ही म्हटले आहे तसेच सरकार पक्षाने निष्णात वकिल ॲड. उज्वल निकम यांची निवड केली त्या बद्दल सरकारचे मनपूर्वकआभार सुद्धा निवेदनात मानले आहेत. मोर्चामध्ये सर्व जनतेने घटणेच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून तहासिलदारांना निवेदन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button