सातारा

सर्वसामावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीमध्ये अशासकीय सदस्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  • सातारा (टीम कृष्णकुंज न्यूज) सर्वसामावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीमध्ये स्थानिक महिला संघटना/संस्थेचे 2 प्रतिनिधी तसेच महिलांच्या कायद्याच्या संदर्भात कार्यरत 5 अशासकीय महिला कार्यकर्ते यांची नियुक्ती करावयाची आहे. तरी संबंधितांनी प्रस्ताव 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात, सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी केले आहे.
    स्थानिक महिला संघटनांचे/संस्थांचे प्रतिनिधी नियुक्त करण्याकीरता संबंधित संस्था नोंदणी 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत संस्था महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात किमान 3 वर्ष कार्यरत असावी तसेच संस्थेने केलेल्या कार्याबाबतचा व महिलांच्या कायद्यासंदर्भात केलेल्या कामकाजाच्या अहवाल, कार्यक्रमांचे फोटो, बातमींचे कात्रणे यासह मागील 3 वर्षाचा वर्षनिहाय वार्षिक अहवालासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, असेही श्री. तावरे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button