
पाचगणी :(टीम कृष्णकुंज न्यूज) पाचगणी येथे गॅलरीत बसलेल्या वयोवृध्द महिलेवर अचानक माकडाने हल्ला केला असून सदर महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. सदर घटनेने मात्र खळबळ सामान्य नागरिक हडबडला आहे.
पाचगणी, ता.( महाबळेश्वर ) येथील हनुमान गल्लीत कृष्णाई पतसंस्था असलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या श्रीमती शोभा बबन कांबळे वय ७५ वर्षीय महिला या दुपारी स्वयंपाक खोलीच्या गॅलरी मध्ये बसल्या होत्या. यावेळी अचानक माकडाने त्यांचे वरती हल्ला केल्यामुळे त्यांचे डोक्यात मोठी जखम झाली आहे.
त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. खाद्याच्या शोधार्थ माकडे नागरी वस्तीकडे धाव घेत असल्याने माकडांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा ही माकडे पर्यटक तसेच सामान्य नागरिक यांच्या हातात असलेल्या पिशव्या पाहून खाद्य पद्रार्थ समजावून हल्ला करण्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
