भिलार

शेतकरी कुटुंबातील शुभम शिंदे याने सार्वजनिक बांधकाम विभागात स्पर्धा परीक्षेतून सहाय्यक अभियंता पदी झेप घेतली

भिलार (टीम कृष्णकुंज न्युज)
शिंदेवाडी ता.जावली येथील गरीब आणि शेतकरी कुटुंबातील शुभम शांताराम शिंदे याने स्पर्धा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदी झेप घेतली असून शिंदेवाडी परिसरातील हा पहिलाच यशस्वी युवक असल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पांचगणी या पर्यटनस्थळाच्या पायथ्याला डोंगर कुशीत वसलेल्या छोटेखानी गावातील शुभम शांताराम शिंदे यांचे प्राथमिक ,व माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे सातारा येथे झाले. त्यानंतर आपले पुढील इंजिनिअरिंगचे शिक्षण वारणानगर येथे झाले. त्यानंतर शुभमने उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. पुणे येथे युपी ऐस सी , एम पी ऐस सी परीक्षेचा त्याने अभ्यास केला. हैद्राबाद येथे जाऊन यूपीएससी, एम् पी ऐस सी या स्पर्धा परीक्षा दिल्या. आणि पहिल्या प्रयत्नात शुभमला भारतीय डाक सेवेत अधिकारी होण्याची संधी मिळाली. पण मोठ्या पदावर जाण्याच्या आशा असल्याने ही संधी स्वीकारावी की नाकारावी या विचारात असताना शासकीय अनुभव मिळावा म्हणून शुभमने भारतीय डाक सेवेत नोकरी स्वीकारली. आणि दापवडी येथे शाखा अधिकारी म्हणून दीड वर्ष काम पाहिले. प्रामाणिक आणि सेवाभावी सेवा करून शुभम ने आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली. पण हे करीत असताना त्याने स्पर्धा परीक्षेची कास सोडली नाही.
नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिव्हील इंजिनिअरिंग असिस्टंट पदी निवड झाली आहे. शिंदेवाडी – दापवडी परिसरातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेला हा पहिलाच अधिकारी असल्याने शुभम शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

  1. अलीकडच्या काळात जावली तालुक्यातील अनेक युवकांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चपदस्थ पदापर्यंत झेप घेण्याचा कल वाढला आहे. शुभम शांताराम शिंदे या होतकरू युवकाने मिळवलेले यश इतर युवकांना दिशादर्शक ठरणारे आहे.                                                    

प्रतिक्रिया : शुभम शांताराम शिंदे ( सहाय्यक अभियंता)माझ्याच गावात मला पोस्ट सेवेच्या माध्यमातून घरच्या लोकांची सेवा करण्याचे मिळालेले भाग्य व त्यांचे लाभलेले आशीर्वाद मला या यशापर्यंत पोहोचण्यास कामी आले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अपयाशाला न घाबरता परिस्थीतीचा विचार करून ध्येय गाठण्यासाठी चिकाटी अंगिकारून स्पर्धा परीक्षेच्या यशातून मिळालेल्या संधीचे सोने करावे. आपले अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील रहावे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button