सातारा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळ्याचे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात रविवारी आयोजन

सातारा  (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क): मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 वाजता सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल  विकास विभाग मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button