मेढा

मेढयासह परिसरात दुपारनंतर विजेच्या गडगडा सह तुफान पाऊस

 

मेढा (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क ) वातावरणातील गत आठ दिवासाची उष्णता पाहता आज मेढा आणि परिसरात दुपारी चार नंतर अचानक गडगडा सह तुफान पाऊसाने हजेरी लावत सगळीकडे पाणीच पाणी केल्याने शेतीला पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी शेतीतील पीक वाहुन जाण्याच्या घटणा नाकारता येत नसल्याने त्याकडे प्रशासनाने पहाणी करावी अशी मागणी होत आहे.गेल्या आठ दिवसापासून कडक उन्हाचा चटका जाणवत असताना आज अचानक  झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले तुंडुंब वाहत असताना पहावयास मिळाले. मेढ्यामध्ये मात्र गटरांच्या बंदिस्तेमुळे सर्व पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत होते तर वेण्णा चौका मध्ये रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे सामाज्य निर्माण झाले आहे. वेण्णा चौक तुडुंब होवुन वाहत असताना दुकानात पाणी घुसून व्यवसायीकांचे नुकसान होत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.सध्या जोरदार पावसाची बॅटीग सुरु असून मेढा शहरामध्ये सातारा महाबळेश्वर रोडवर वेण्णा चौकामध्ये पाणी तुंबत आहे. तुंबलेले पाणी कुसुंबकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहत जात असताना ते दुकानांमध्ये घुसून मालाचे नुकसान करीत आहे. रस्त्याच्या दुतर्फा बांधलेले गटर हे निव्वळ शोपीस म्हणून झाले असून पाणी गटरमध्ये जाण्यासाठी संबंधीत ठेकेदाराने जागा ठेवली नसल्याने पाणी गटरमध्ये न जाता ते रस्त्यामध्ये तुंबत आहे. हि समस्या प्रति वर्षी जाणवत असल्याने त्यावर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शहरातुन वाहनांची ये जा सुरू असुन पाण्याचे फवारे उडले जात असल्याने दुकानदारांना व रस्त्याने चालणाऱ्या सामान्य माणसाला त्याचा त्रास होत आहे. नगर पंचायती कडून उपाययोजना केली जात असली तरी बांधकाम विभागाकडे त्या रस्त्याची मालकी असल्याने बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा सामान्य नागरीकाची आहे.मेढ्या सह परिसरात विजेच्या गडगडसह जोरदार पाऊस झाल्याने पिके जोमात येतील असा अंदाज नागरीकांच्या बोलण्यातून येत आहे परंतु असाच जोरदार पाऊस सुरु राहील्यास पिकांचे नुकसान सुद्धा होणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या आठ ते दहा दिवसांच्या उघडीपा नंतर शेतीची भांगलणी कोळपणी लोकांनी पूर्ण केली असल्याने शेतीला हा पाऊस पोषक झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button