मेढा
Trending

जावळीचे शैक्षणिक पॅटर्न राज्याला दिशादर्शक ठरले – मनोज भोसले

मेढा येथे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी मनोज भोसले, एपीआय पृथ्वीराज ताटे व अन्य मान्यवर ( छाया-सोमनाथ साखरे )

मेढा(टीम कृष्णकुंज नेटवर्क)  जावळी तालुका दुर्गम डोंगराळ असला तरी येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता उच्च प्रतिची असून जावळीने दिलेले शिष्यवृत्ती पॅटर्नसह अनेक उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरले आहेत असे प्रतिपादन गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी केले. पंचायत समितीच्या बाबासाहेब आखाडकर सभागृहात जावली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्याचे वाटप उद्योजक हणमंतराव पवार यांच्या वतीने करण्यात आले यावेळी मनोज भोसले बोलत होते. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सामाजिक कार्यकर्ते संजय संकपाळ, जिल्हा परिषद विस्तार अधिकारी संजीवनी मुळे, चंद्रकांत कर्णे, सुरेश मोरे, केंद्रप्रमुख मिलन मुळे, आर. टी. दळवी, हंबीरराव जगताप, शंकर बिरामणे, सुभाष दुटाळ, बळवंत पाडळे, विषय साधनव्यक्ती गणेश वंजारी, योगिता जगताप, दत्तात्रय चव्हाण, शिक्षक नेते सुर्यकांत पवार, शिक्षक समितीचे अध्यक्ष सुरेश पार्टे, शिक्षक बॅंकेचे माजी संचालक शंकरराव जांभळे, पी. व्ही. धनावडे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी भोसले पुढे म्हणाले की, जावलीत माॅडेल स्कूलसह सर्व शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरवण्याबरोबरच तंत्रज्ञान विषयक ज्ञान देण्यासाठी ही प्रयत्नशील आहे. तसेच यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित न होवून देता कष्ट करावे यामुळे नक्कीच यश मिळेल. सोशल मिडियापासून मुलांनी लांब रहावे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सायबर सुरक्षा कार्यक्रम घेऊ असा विश्वास उपस्थितांना दिला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व त्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षी करणाऱ्या हणमंतराव पवार यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे ही गौरवोद्गार पृथ्वीराज ताटे यांनी काढले.यावेळी कार्यक्रमासाठी मदत करणारे उद्योजक हणमंतराव पवार यांनी ही आपले विचार व्यक्त केले. मेढा येथील गांधीनगर शाळेला पवार यांच्या वतीने दोन कपाट भेट देण्यात आली तर तालुक्यातील पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्याचे वाटप पवार यांच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन मोहिते यांनी केले तर आभार योगिता मापारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button