पाचगणी येथे रान भाजी महोत्सव संपन्न रानभाज्या हे निसर्गाचे वैभव, आहाराचे पोषणमूल्य वाढते – नितीनदादा भिलारे


महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नितीनदादा भिलारे, लक्ष्मी कऱ्हाडकर,भूपाल बुधाले, महेंद्र पांगारे , अमोल चोरमले व इतरमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नितीनदादा भिलारे, लक्ष्मी कऱ्हाडकर,भूपाल बुधाले, महेंद्र पांगारे , अमोल चोरमले व इतर पांचगणी (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क) रानभाज्या निसर्गाचे वैभव असून आहाराचे पोषणमूल्य वाढवणाऱ्या असतात. तसेच त्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याने कृषि विभागाने आयोजित केलेला रानभाजी महोत्सव कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीनदादा भिलारे यांनी केले.रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने पाचगणी शाॅपींग सेंटर येथे महाबळेश्वर तालुका कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) सातारा तर्फे रानभाजी महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला होते. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी पाचगणीच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर,महाबळेश्वर तालुका कृषि अधिकारी भुपाल बुधावले,कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र भिलारे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे, प्रगतशील शेतकरी गणपत पार्टे ,राजेंद्र दुधाणे , मंडल कृषि अधिकारी डोईफोडे, अमोल चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मी कऱ्हाडकर म्हणाल्या पाचगणी परिसरात पावसाळ्याच्या दिवसात डोंगरकुशीत वसलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्यांमधील अनेक औषधी गुणधर्मही उपयुक्त असतात. पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटन स्थळावर कृषि विभागाने या महोत्सवाचे आयोजन केल्याने येणाऱ्या पर्यटकांना या रानभाज्या खरेदी करता येणार आहेत. कृषि पर्यवेक्षक श्री.मनोज पाटील यांनी रानभाज्याचे आहारातील महत्व सांगितले महोत्सवात रानभाज्या भारंगी, भालगा, कुर्डी मोहरी, चीचुर्टी,चिवचिव , कोहिळ, कर्टोलो, आळू, तोंडली, वॉटर ग्रास , शेंडवल प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्या होत्या.शेवटी बीटीएम श्री. पार्टे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .यावेळी सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देवून प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करणेत आला सर्व कृषि पर्यवेक्षक , कृषि सहाय्यक , बीटीएम , राजपुरी, खिंगर , ओब्रळ , गोडवली , गुरेघर , पांगारी , भिलार व परीसरातील शेतकरी उपस्थित होते .
