पाचगणी प्रभाग क्र. ८ (अ) च्या सर्वांगीण विकासासाठी सचिन मोरे यांचे आश्वासन; युवक, महिला व मूलभूत सुविधांना प्राधान्य


पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क):
पाचगणी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्र. ८ (अ) (अनुसूचित जाती राखीव) मधून उमेदवारी अर्ज करणारे श्री. सचिन मोरे यांनी आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण म्हणून ओळख असलेल्या मोरे यांनी बेरोजगारी, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व सांस्कृतिक सुविधा यांसारख्या मूलभूत समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दीर्घकाळ टिकणारे समाधान देणे हेच माझे ध्येय आहे,” असे मोरे यांनी स्पष्ट करताच, प्रभागात त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.युवकांसाठी ठोस योजना: बेरोजगारीवर कायमचा तोडगा सामान्य वर्गातील तसेच सर्व युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना.कौशल्यविकास, लघुउद्योग आणि जॉब-अभ्यासकेंद्र यांसाठी पुढाकार.प्रलंबित असलेली *धर्मवीर संभाजी महाराज व्यायामशाळा त्वरित सुरू करण्याचे आश्वासन*.मूलभूत सुविधा – रस्ते व स्वच्छतेला प्राधान्यप्रभागातील सर्व रस्त्यांचा दर्जा उंचावण्याचा निर्धार.नियमित कचरावेचक गाड्या, स्वच्छता कर्मचारी व प्रणाली सुधारण्याचे आश्वासन.प्रत्येक नागरिकांच्या लहान-मोठ्या गैरसोयींचा स्वतंत्र अभ्यास करून तत्काळ तोडगा.सांस्कृतिक आणि सार्वजनिक सुविधा पॉवर हाऊस भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन त्वरित उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.मुलांसाठी, महिलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी समुदायभिमुख उपक्रम राबवण्यावर भर. महिला आणि गरजूंसाठी मदतीचे कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना लघु उद्योग उभारण्यासाठी आर्थिक व सल्लागार मदत.महिला स्वयंसहाय्य गटांना बळकटी देण्याची योजना.भूखंड मालकी हक्काचा मुद्दा—प्रमुख लक्ष फायनल प्लॉट 487, टी.पी. स्कीम 3 मधील सर्व घरांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न.भाडेपट्टा कायमस्वरूपी करण्यासाठी प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा.प्रभाग ८ (अ) मधील नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला गांभीर्याने घेऊन, वास्तववादी व शाश्वत विकास करण्याचा संकल्प करत असल्याने, श्री. सचिन मोरे यांच्या उमेदवारीबद्दल मतदारांमध्ये उत्साह आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
