पांचगणी

पाचगणी पोलिसांची मोठी कारवाई: बलात्कार आणि फसवणूक प्रकरणात आरोपीला अटक

​पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) – पुणे येथील एका २८ वर्षीय पीडित महिलेवर बलात्कार आणि फसवणूक केल्याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी जयंत अतुल दाभोळे (वय २८, रा. कात्रज, पुणे, मूळगाव विटा, ता. खानापूर, जि. सांगली) या आरोपीला अटक केली आहे.
​आरोपी जयंत दाभोळे याने पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा विश्वास संपादन केला.​त्याने प्रेमाचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली आणि तिला दुचाकीवरून पाचगणी येथे आणले.​दिनांक २४.११.२०२३ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पाचगणी येथील एका बंगल्यामध्ये आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध व संमतीशिवाय तिच्याशी शरीरसंबंध केले.​त्यानंतर पुणे येथेही आरोपी आणि पीडिता जिथे राहत होते, त्याठिकाणी आरोपीने वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध व संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवले.
​दरम्यान, पीडित महिला गरोदर असल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन गर्भपात (अॅबॉर्शन) केला.​पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यावर आरोपीने तिला नकार देऊन फसवणूक केली.​गुन्ह्याची नोंद आणि तपास ​पीडितेच्या तक्रारीवरून सुरुवातीला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे येथे गुन्हा दाखल झाला होता, जो वर्ग होऊन पाचगणी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला.​दिनांक २४.०९.२०२५ रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २२५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ६५(२)(एम), ६९, ३१८(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी परागंदा होता आणि त्याने कोणाशीही संपर्क ठेवला नव्हता.​सातारा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग श्री. सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.​आरोपीच्या शोधासाठी पाचगणी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक, ज्यात पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पो.हवा. निलेश माने व पो.काँ. विक्रम जाधव यांचा समावेश होता, हे दि. २७.०९.२०२५ रोजी सांगली जिल्ह्यासाठी रवाना झाले. ​पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमी आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपीचा शोध लागला.​पथकाने आरोपी जयंत अतुल दाभोळे याला दिनांक २७.०९.२०२५ रोजी त्याच्या मूळगावी विटा, ता. खानापूर, जि. सांगली येथून ताब्यात घेतले आहे.​सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button