पांचगणी

पाचगणीत उद्या मराठा जागृती रॅलीचे आयोजन ; मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज एकवटला

 

पाचगणी(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क): सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे आरक्षण मागणीला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. यासाठी त्यांचा लाखो समर्थकांसह आणि मराठा बांधवांसह मोर्चा निघाला आहे. जुन्नर मार्गे जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. प्रशासन आणि कोर्टाच्या अटीशर्तींसह एक दिवसाच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पांचगणी व परिसरातील सकल मराठा बांधवाचे वतीने उद्या सकाळी शहरातून मराठा जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत आयोजकांनी माहिती देताना सांगितले मनोज जरांगे पाटील यांच्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणाकरता चालू असलेल्या आंदोलनाकरिता जाहीर पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या शुक्रवार दिनांक २९ रोजी सकाळी दहा वाजता पाचगणी व पाचगणी परिसरातील समस्त सकल मराठा समाज बांधवांचे वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातून मराठा जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाबळेश्वर तालुक्यातूनही बरेच कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत परंतु जे जाणार नाहीत त्यांनी उद्या सकाळी हजार रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button