पांचगणी

पांचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी पंडित पाटील यांची नियुक्ती : जुन्या मुख्याधिकारी यांची २१ दिवसात गंछती

पांचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)गेले काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

यामुळे मी येणार येणार म्हणत खुर्चीवर आलेल्या अतिरिक्त मुख्याधिकारी यांची तडकाफडकी बदली झाल्याने श्री जाधव यांची गंछती झाली असल्याचे बोलले जात आहे. नगरविकास विभागाच्या अवर सचिवांकडून प्रतिनियुक्तीवर या नेमणुकीचे आदेश काढले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव यांची २० मार्च २०२४ रोजी बदली झाल्याने ही जागा काही दिवस रिक्त होती. त्यानंतर त्याचा अतिरिक्त कार्यभार महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी यांचेकडे होता. परंतु निखिल जाधव यांची सांगली महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी बढती मिळाली. परंतु जुन्या पाचगणी नगरपालिकेत आपला जीव अडकून राहिलेल्या जाधव यांनी अगदी वरिष्ठ पातळीवरून फिल्डिंग लावत नामदार मकरंद आबा पाटील तसेच स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची नाराजी ओढवून घेतली व ५ जूनला पुन्हा पांचगणी पालिकेचा अतिरिक्त कार्यभार मिळवला. मी येणार येणार म्हणत निखिल जाधव यांनी स्थानिक आमदार व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. यामध्ये निखिल जाधव यांची झालेली बदली स्थानिक नेतृत्वाच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी निखिल जाधव यांच्या बदलीसाठी आपली ताकद पणाला लावली. यात यशस्वी होत त्यांनी २१ दिवसात निखिल जाधव यांना स्वगृही पाठवत पंडित पाटील यांना पांचगणी नगरपालिकेत नियुक्ती मिळवून दिली.नवे मुख्याधिकारी पंडित पाटील यांचे मूळगाव आरग (ता. मिरज) आहे. २०१० साली पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माझलगाव (जि. बीड) येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, लोणावळा,साता-यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले. त्यानंतर बढती मिळाल्याने सांगली-मिरज व कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदची जबाबदारी मिळाली. आता पंडित पाटील हे कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त होते. तेथून आज ते पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button