Uncategorized

पंडित पाटील यांनी स्विकारला पाचगणी पालिकेचा मुख्याधिकारी पदाचा कार्यभार;

स्वच्छ पाचगणीची शहराची ओळख स्वच्छ सुंदर ओळख टिकवण्यासाठी करणार प्रयत्न

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेचे अतिरिक्त कार्यभार असलेले मुख्याधिकारी निखिल जाधव यांची तडकाफडकी बदली झाल्याने त्यांच्या जागी नवनियुक्त मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी आज कार्यभार स्वीकारला.यापूर्वी ते कोल्हापूर महापालिका उपायुक्त म्हणून कार्यरत होते.मागील मुख्याधिकारी निखिल जाधव यांची तडकाफडकी बदली झाल्याने नवनिर्वाचित मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी पालिकेची सुत्रे आपल्या हाती घेतली.पाटील यांचे मूळ गाव मिरज तालुक्यातील आरग असून २०२० साली त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली. त्यांनी माजलगाव,जत, लोणावळा, म्हसवड,कागल अशा ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले.बढती मिळाल्यानंतर त्यांनी सांगली -मिरज-कुपवाड महापालिका उपायुक्त म्हणून जबाबदारीने काम पाहिले होते.पंडित पाटील यांनी आज सकाळीच गिरीस्थान नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी पदाचा आपला पदभार स्विकारण्यासाठी हजर झाले .यावेळी माजी स.पो.नी दिलीप पवार,नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामणे,दिलिपभाऊ बगाडे, मिलिंद कासुर्डे, उद्योजक राजेंद्र पारठे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहूल पुरोहित, रुपेश बगाडे,दिपक कांबळे, रवि माने, राजेश पारठे, पत्रकार आदींनी पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button