मेढा

प्रतिपंढरपूर करहर येथे नामदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते “श्री विठुरायाची महापूजा” संपन्न ; आ.शशिकांत शिंदेंसह मान्यवरांची उपस्थिती भाविकांची दर्शनासाठी गर्दी –

 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व आ. शशिकांतजी शिंदे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. (छाया :सुरेश पार्ठे)

मेढा / प्रतिनिधी(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिपंढरपुर करहर ता. जावळी येथे विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व आ. शशिकांतजी शिंदे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली.


आज आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी ! या उत्सवानिमित्त दरवर्षी प्रतीपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या करहर ता. जावली येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करहरनगरीत विठुरायाची आजची महापूजा भक्तीभावाने संपन्न झाली. करहर येथील विठ्ठल मंदिरात सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ही महापूजा पार पडली. यावेळी करहर येथील तीन वारकरी दाम्पत्यांनाही विठुरायाच्या पुजेचा मान देण्यात आला. यावेळी नामदार भोसले यांच्यासमवेत जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखाना अध्यक्ष सौरभ शिंदे, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, उद्योजक दत्ता भालेघरे तहदिलदार हणमंत कोळेकर, करहरच्या सरपंच सौ.सोनाली यादव, ग्रामस्थ प्रसाद यादव, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते,
धार्मिक पूजेनंतर मंदिरात भाविक भक्तांना सुरवात झाली. यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य लाभो अशी प्रार्थना विठ्ठल- रुक्मिणी चरणी केली. तसेच तमाम विठ्ठलभक्त आणि वारकरी बंधू- भगिनींना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button