नितीन सुर्वेची गौरी इलेव्हन ने पटकावले 22 गाव प्रीमियर लीग चे प्रथम पारितोषीक

मेढा प्रतिनिधी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 22 गाव प्रीमियर लीग 2025 पर्व आठ क्रिकेटचे सामने भैरवनाथ स्टेडियम पावशेवाडी या ठिकाणी पार पडले. विशेष म्हणजे ही स्पर्धा सातत्याने क्रिकेट खेळत असताना सामाजिक, शैक्षणिक, व वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या विभागातील गरजवंत लोकांना मदत करत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी महाराष्ट्र मध्ये एक अग्रेसर अशी संस्था आहे. बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य (तथा पालक मंत्री लातूर) शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्याचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांच्या योगदानाने व मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा भरवण्यात आली होती. आज पर्यंत या स्पर्धेने आठ वर्षांमध्ये शंभरहून अधिक लोकांना वैद्यकीय मदत केली आहे. दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले आहे. तसेच कोरोनामध्ये बामणोली विभागातील लोकांना वैद्यकीयसाठी असो किंवा जीवनावश्यक वस्तूचे वाटप असो अशा माध्यमातुन मदतीचा हात पुढे केला.
तसेच गाव विभागातील युवा उद्योजक संतोष जाधव, संदीप शिंदकर,के.के.शेलार,लक्ष्मण जाधव,आनंद पवार,जितू सपकाळ,विजय शिंदे, गणेश शिंदे, प्रवीण पाटील,नितेश शिंदे,बाळू पवार,संतोष साळुंखे आणि भागातील सर्व यांनी भागातील मुलांना काही कमी पडू नये म्हणून पुढे येऊन खूप मोठे आर्थिक पाठबळ उभे केले.
तसेच किसन भोसले हॉटेल वासोटा ऍग्रो टुरिझम, देसाई वाडा ,विराज स्पोर्ट्स यांचे मार्फत बॅट वाटप करण्यात आले असून विनोद भणंगे,किरण साळुंखे, आरोही टेन्ट हाऊस किसन साळुंखे,हॉटेल वनराई निलेश भोसले, किरण भोसले,सुभाष पवार, विजय पवार, आबा डिगे यांनी विशेष सहकार्य केले, असून तसेच भागातील युवा उद्योजक संतोष जाधव यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय क्रमांकांची बक्षीस देण्यात आली असून संदीप दादा व सातारा मेडिकल असो. अध्यक्ष प्रवीण पाटील आर्थिक मदत केली.क्रिकेट मधून येणारे प्रत्येक पैशाचा आपल्या विभागासाठी आणि आपल्या विभागातील गोरगरीब लोकांसाठी 22 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून लोकांना मदत करणे हेच ध्येय समोर ठेवून यावर्षी सुद्धा एक भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेला नामवंत समालोचक म्हणून चंदू शेठे, जयेश भोसले, निलेश मढेंकर, प्रदीप शिंदे तर पंच म्हणून रमाकांत पवार व सादिक सर उपस्थित होते. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहिले ते म्हणजे मालिकावीरला ग्रामीण भागात प्रथमच मॅन ऑफ द सिरीज साठी लक्ष्मण नामदेव शिंदकर यांचे कडून दुचाकी देण्यात आली.तसेच दुचाकीचा मानकरी हा जाधवउंबरी ता.जावली गावचा खेळाडू ऋषी दिलीप जाधव हा ठरला. या स्पर्धेमध्ये बामणोली विभागातील 22 गावातून आठ संघ घेवून निवड प्रक्रिया च्या माध्यमातून खेळाडू निवडले गेले या स्पर्धेमध्ये कास गावच्या गौरी रॉयल 11 कास या संघाने प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख पटकावला व द्वितीय क्रमांक रोख रक्कम 51 हजार जाधव उंबरी गावच्या आरोही 11 या संघाने पटकावला या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण सातारा 7 टी याद्वारे दाखवण्यात आले अंतिम सामना खूप चुरशीचा झाला.सहा बॅाल मध्ये पाच धावा पाहिजे असताना समीर शिंदे या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी करत गौरी रॉयल कास-11 या संघाला विजेतेपद पटकावून दिले.ही स्पर्धा जिंकल्यानंतर कास गावामध्ये विजयी संघाची भव्य मिरवणूक व सर्व खेळाडूंचा सन्मान करून स्वागत करण्यात आले, ही स्पर्धा आता क्रिकेट खेळत असताना सामाजिक कार्य आणि शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याने खेळाच्या माध्यमातून एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे एक जुटीने व जिव्हाळयाने ही हे सामने पार पाडले जातात.स्पर्धेची पारितोषिक-प्रथम क्रमांक – गौरी रॉयल 11 कास एक लाख चषक,द्वितीय क्रमांक – आरोही 11 जाधव उंबरी 51 हजार चषक,उत्कृष्ट फलंदाज – अक्षय साळुंखे शेंबडी,उत्कृष्ट गोलंदाज – समीर शिंदे कोळघर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – पांडुरंग शिंदे कोळघर,मॅन ऑफ द सिरीज – ऋषी जाधव जाधव उंबरी,लेजंड खेळाडू – बाळू पवार पावशेवाडी यांना सन्मानित करण्यात आले तसेच मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.