पांचगणी

पांचगणी पोलीस हद्दीतील गहाळ झालेले ४ लाखांचे २५ मोबाईल पोलिसांनी केले नागरिकांना परत

पांचगणी पोलीस ठाण्याच्या सायबर व गुन्हेप्रकटीकरण शाखेची यशस्वी कामगिरी…

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क )पांचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईचा तपास करुन एकुण ४ लाख रुपये किमतीचे २५ मोबाईल पाचगणी पोलिसांनी नागरीकांना परत केले असून पांचगणी पोलीस ठाण्याच्या सायबर व गुन्हेप्रकटीकरण शाखेचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.पांचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे मोबाईल गहाळ होणेचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने मा. वरीष्ठांचे आदेशाने त्या अनुषंगाने मा वरीष्ठांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. मा वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस अंमलदार यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईलचा तपास हाती घेतला होता.पांचगणी पोलीस ठाणे दाखल गहाळ मधील मोबाईल फोनचे बुद्धी कौशल्याने व तांत्रिक माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील परीसर व आजुबाजुचे पोलीस ठाणे हद्दीतील गावातुन तसेच इतर जिल्ह्यातून शोध घेवुन एकुण ४ लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण २५ मोबाईल फोनचा शोध घेवुन ते प्राप्त करण्यास सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले असुन नमुद फोन नागरीकांना परत करणेत आलेले आहेत.
सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर साो सातारा व उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम साो वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस ठाणेचे स. पो.नि. दिलीप पवार व सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार पो. नाईक तानाजी शिंदे, पो. कॉन्स्टेबल उमेश लोखंडे , अमोल जगताप यांनी सहभाग घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button