भिलार

कडक उन्हामुळे जलस्त्रोत कमी होत आहेत पाण्यापासून पक्षांची होणारी तगमग लक्षात घेत भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पक्षासाठी बनवली पाण्याची आठ डबकी

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
भिलार येथील हिलरेंज माध्यमिक परीसरात लहान मोठे वृक्ष आहेत. त्यामुळे परिसरात पक्षांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे.यावर्षी उन्हाळा कडक जाणवत आहे. हंगामाच्या प्रारंभापासून तापमान वाढले आहे. गत दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील उच्चांकी तापमान वाढ हवामान केंद्राकडून नोंदवण्यात आली आहे. नागरिकांचीदेखील उकाड्याने तगमग होत आहे.पशुपक्ष्यांची देखील उन्हाने होरपळ होत आहे. याचे भान ठेऊन हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक शांताराम जाधव आणि विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरात पक्षासाठी आठ पाण्याची डबकी तयार केली आहेत.उन्ह वाढल्याने नैसर्गिक जलस्त्रोत
आटू लागले आहेत.वणव्यांमुळे डोंगर टेकड्या काळवंडल्याने जंगली झाडे व त्यावरची फळे
देखील नष्ट झाली आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना खाण्यासाठी निसर्गात मिळणारी पाने-फळेदेखील उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे त्यामुळे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button