भिलार

काटवली व दापवडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

काटवली : ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मीनाक्षी बेलोशे यांचे उपस्थितीत पुष्पहार घालण्यात आला.

भिलार (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ वी जयंती भिवंडीत मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. काटवली (तालुका जावळी ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. मीनाक्षी बेलोशे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, ग्रामपंचायत सदस्य शशिकला बेलोशे, वैशाली खरात , रमेश शिंदे, दीपाली गोळे, अश्विनी बेलोशे, पल्लवी जंगम , माजी सरपंच बाळू सुतार, नवनाथ बेलोशे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांनतर काटवली येथील प्राथमिक शाळेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक व शिक्षकाचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर दापवडी गावातील भीमज्योत मंडळातर्फे चवदार तळावरून ज्योत आणून भव्य दिव्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच परिसरातील रांजणी, वहागाव, रुईघर, गावातील सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून भीम जयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जावळी तालुक्यातील दापवडी येथे भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सव समिती व काँग्रेश्वर सेवा मंडळाच्या वतीने महाड येथील चवदार तळावरून ज्योत आणण्यात आली. यावेळी स्नेहभोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली होती. ग्रामीण भागात अशा विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button