भिलारमेढा

काटवली – ठाणे रातराणी बससेवा सुरू ; काटवली येथून बसचा आज जल्लोषात झाला शुभारंभ

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क): मेढा-काटवली मार्गे ठाणे हीभिलार रातराणी बससेवा आजपासून सुरू झाली असून या गाडीचा आज रात्री आठ वाजता काटवली येथून परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत या गाडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदिप पवार, सामाजिक कार्यकर्ते अशोक सरकाळे, विष्णु बेलोशे, रांजणी सोसायटीचे चेअरमन रामदास रांजणे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष रविकांत बेलोशे, काटवली सरपंच मीनाक्षी बेलोशे, गोपाळ बेलोशे, संजय बेलोशे, साहेबराव गोळे, राजेंद्र बेलोशे, विक्रम पोरे, दत्तात्रय बेलोशे, मधुकर बेलोशे, महादेव शिंदे, संतोष बेलोशे,सुनीता बेलोशे, सीमा पाटील, शीला बेलोशे, रघुनाथ गोळे, जगन्नाथ बेलोशे,भरत बेलोशे,सुनील शिंदे, वसंत बेलोशे, गणेश जंगम तसेच बेलोशी, दापवडी, रुईघर तसेच परिसरातील ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी सरपंच सौ बेलोशे यांनी गाडीचे पूजन केले. संदिप तरडे (चालक) आणि सलीम आतार (वाहक) यांचा यावेळी शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तर या नव्या गाडीचे प्रथम प्रवासी म्हणून अभिषेक बेलोशे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
राज्य परिवहन मेढा आगारामार्फत मेढा, काटवली, करहर, हुमगांव, कुडाळ, पाचवडमार्ग ठाणे अशी ही रातराणी बस धावणार आहे. सदर बसची सुटण्याची वेळ मेढा येथून सकाळी.०७.१५, काटवली येथे येईल आणि काटवली येथून ती ८ .१५ वाजता प्रवासाला निघेल. तसेच ठाणे येथुन पुन्हा दुसरे दिवशी निघण्याची वेळ ही सकाळी ११.०० अशी राहणार आहे. ती गाडी थेट पाचवड वरून साताऱ्याला जाईल.या परिसरातून अनेक प्रवाशांना पाचवड येथे जाऊन बस पकडव्या लागत होत्या. यासाठी आम्ही मागणी करून पाठपुरावा केला. आगारप्रमुख यांनी तातडीने दखल घेवून ही काटवली – ठाणे रातराणी गाडी आजपासून सुरू केली आहे या नव्या बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन यावेळी संदीप पवार यांनी केले.
सरपंच मीनाक्षी बेलोशे यांनी सांगितले मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना ही बस सेवा आपुलकीची सेवा ठरावी ही बस कायम चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू असे सांगितले. जावळी कराना अशा सेवा मिळवण्यासाठी आंदोलने करावी लागतात. हे दुर्दैव आहे. परंतु मेढा आगाराच्या आगारप्रमुख यांनी सकाळी गाडी सुरू करून आपल्या आग्रहाखातर पुन्हा रातराणी गाडीची सेवा सुरू केली आहे. आपल्या सर्वांच्या हा विकासाचा सेतू असल्याचे सामजिक कार्यकर्ते अशोक सरकाळे यांनी सांगितले. या बस मुळे या परिसरातील मुंबईला जाणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांना चांगली सोय होणार आहे. गेली पंधरा वर्षापूर्वी या परिसरातील दापवडी – मुंबई ही बस सुरू होती ती बंद केल्यानंतर पुन्हा बस नव्हती त्यामुळे या गाडीमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. खाजगी गाड्यांपेक्षा हा सर्वांना सुरक्षित आणि कमी खर्चातील प्रवास मिळणार आहे.

प्रतिक्रिया : निता बाबर, मेढा आगारप्रमुख
काटवली – ठाणे या सकाळच्या गाडीच्या यशस्वी प्रवासानंतर आता काटवली, बेलोशी , करहर, हुंमगाव कुडाळ परिसरातील प्रवाशांच्या मागणीनुसार आता संध्याकाळची रातराणी गाडी आपण आजपासून सुरू करीत आहोत. सकाळच्या गाडीला जसा प्रवाशांनी प्रतिसाद दिला अशाच पद्धतीने रातराणी गाडीला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्यावा जेणेकरून ती गाडी आपणाला कायम चालू ठेवता येईल असे आवाहन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button