पांचगणी

पांचगणी शहरात भिकारी आणि गर्दूल्याचां हैदोस ; पालिकेची डोळेझाक , उभ्या इमारतीचा दरवाजा दिला पेटवून

पांचगणी (टीम कृष्णकुंज नेटवर्क)
पांचगणी : पांचगणी शहरात भिकारी आणि गर्दूल्यानी हैदोस माजवला असून नगरपालिकेच्या समोरच असणाऱ्या मैदानात काही भिकारी व गर्दुल्यांनी उघड्यावर आपले संसार थाटले आहेत. याकडे मात्र पालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आज येथील इमारतीचा दरवाजा या लोकांनी जाळून टाकला आहे. या लोकांवर तातडीने कारवाई करावी आणि त्यांना शहराबाहेर काढावे अशी मागणी होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की नगरपालिकेच्या मराठी शाळेला लागूनच असणाऱ्या मोकळ्या जागेत गेली दोन वर्षापासून एक भिकारी जोडपे उघड्यावर आपला संसार थाटून राहत आहे. त्यांनी आता आणखी लोक त्याठिकाणी आणून स्थिरावली आहेत. रात्रीच्या वेळी दारू पिऊन या लोकांचा दंगा वाढला आहे. उघड्यावर चूल पेटवून त्यांचा उदरनिर्वाह चालला असला तरी यावठिकाणी त्यांनी केलेल्या घाणीमुळे या परिसराला दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेजवळ हा प्रकार असून पालिका या लोकांना का पाठीशी घालत आहे हा सवाल उपस्थित होत आहे.या लोकांनी एक एक करीत या ठिकाणी चार ते पाच लोकांना येथे स्थायिक केले आहे. दिवसभर दारू पिऊन या लोकांचा दंगा पहायला मिळत आहे. दिवसभर ते या मैदानात झोपलेले दिसतं आहे. आज तर या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या दरवाजाला यातीलच एकाने आग लावली. यामध्ये दरवाजा पूर्णपणे जळून गेला आहे.या अस्वच्छता, दुर्गंधी आणि घाणीमुळे पाचगणीच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे तरी तातडीने या लोकांवर कारवाई करावी व त्यांना पांचगणीतून हाकलून द्यावे अशी मागणी पाचगणीतील सामान्य नागरिक, पत्रकार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button