
भिलार प्रतिनिधी (टीम कृष्णकुंज नेटवर्क): सर्वत्र विखुरलेल्या आपल्या बांधवांना एकत्र करून एकमेकांशी संवाद साधताना सुख दुःखाची झालेली देवाण घेवाण पुढल्या आयुष्यासाठी ऊर्जा देणारी ठरावी या उद्देशाने पाचगणी येथे
कृष्णाजी माने परिवार संमेलन हा एक अनोखा आणि भव्य कुटुंब मेळावा उद्योजक राजेंद्र मारुती माने यांच्या वतीने दोन दिवस पंचगणी लायब्ररी क्लब येथे आयोजित करण्यात आला. याला माने कुटुंबियांनी भरभरून प्रतिसाद दिला.हे माने कुटुंबाचे आगळेवेगळे संमेलन उद्योजक राजेंद्र माने यांचे आजोबा श्री. कृष्णाजी माने यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये सुमारे ३२५ कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सुंदररित्या सजवलेले स्थळ, बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी आरामदायक निवास व्यवस्था, तसेच दोन दिवसांचे स्वादिष्ट भोजन यांचा समावेश होता. कुटुंब परिचयाचा विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. जिथे प्रत्येक सदस्याला त्यांच्या कुटुंबाचा इतिहास सांगण्याची आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी देण्यात आली. तसेच याठिकाणीं प्रत्येक कुटुंबाने आपल्या भावंबंदाशी, कुटुंबाशी मनसोक्त संवाद साधला. यामुळे ते आणखी जवळ आले. तर याबरोबरच मजा, मस्ती, आनंद घेत हे माने कुटुंबीय एकमेकांच्या आणखी जवळ आले.
या संमेलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कृष्णाजी माने यांच्या सहा पिढ्या एकत्र आल्या. यावेळी विजय गजानंद दळवी, वसंत भिकोबा पवार, उमेश वसंत पवार, रमेश हरिभाऊ माने, प्रभाकर मारुती माने, हनुमंत नारायण माने, प्रमोद लक्ष्मण माने, चंद्रकांत अनंतराव माने, जगन्नाथ रामचंद्र माने यांनी उपस्थिती दिली.
या संमेलनात जवळपास सहा पिढ्यांनी सहभाग घेतला आणि संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचा एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. संमेलनाचे मुख्य आकर्षण देवी जागर होते, जिथे सर्वांनी एकत्र येऊन देवी घाटजाई यांच्या चरणी प्रार्थना अर्पण केली आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुख-समृद्धीची कामना केली. कार्यक्रमाचा समारोप कृतज्ञतेच्या शब्दांने करण्यात आला, ज्यांनी हा सुंदर आणि संस्मरणीय मेळावा आयोजित केला आणि त्याचे संपूर्ण आयोजन केलेल्या राजेंद्र माने यांचे सर्वांनी आभार मानले.

सोबत फोटो आहे
पांचगणी : अशा प्रकारे माने कुटुंब एकत्र आले होते.
