पांचगणीशहर

रविराज जोशी व सुहास लक्ष्मण वाकडे यांच्या दहशतीला जिल्हा प्रशासनाकडून केराची टोपली. : फटाके वाजवून ग्रामस्थांनी केला आनंद साजरा

पांचगणी(टीम कृष्णकुंज नेटवर्क) महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील केदारेश्वर देवस्थान जमिनीबरोबर अख्या गावाची सुप्रीम कोर्टापर्यंत मालकी सांगत फिरणारे सुहास वाकडे व रविराज जोशी यांनी गैर फेरफार करून थापा पॉईंट सर्व्हे नं 10 वर वहिवाटदार म्हणून स्वतःचे नाव लावणाऱ्या दोघांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. या निर्णयाने ग्रामस्थांनी आपला आनंद फटाके वाजवून व पेढे वाटून व्यक्त केला.


याबाबत अधिक माहिती अशी की सुप्रीम कोर्टापर्यंत अख्या गावाची मालकी सांगत फिरणारे सुहास वाकडे व रविराज जोशी यांनी गैर फेरफार करून थापा पॉईंट सर्व्हे नं 10 वर केदारेश्वर देवस्थानच्या समोर वहिवाटदार म्हणून स्वतःचे नाव लावले. याबाबत महसूल मंत्र्याकडे दावा प्रलंबित असताना सुद्धा गावच्या जमिनी स्वतःच्या आहेत असं भासवून अनेक लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार केला. त्यांच्या विरुद्ध पोलिसानि एफ आय आर दाखल केली आहे तसेच महाबळेश्वर कोर्टाने पोलिस चौकशीचे आदेश दिले आहेत.थापा सर्व्हे नं 10 ही संपूर्ण पाचगणीमध्ये मोक्याची जागा असून या ठिकाणे अनेक पर्यटक भेट देत असतात. या फायद्याचा विचार करून ह्या 18 एकर जागेवर वाकडे यांनी गैर मार्गाने कब्जा केला आहे. त्या विरुद्ध वाई उपविभागीय अधिकारी वाई यांनी 2018 रोजी जागा सील करण्याचे आदेश दिले होते. वकील जोशी यांचे गैरव्यवहार दिवसेंदिवस वाढतच होते. गावकऱ्यांनी कलेक्टर सातारा यांना निवेदन देऊन कारवाई करायची मागणी केली व प्रशासन त्वरित ॲक्शन मोड वर आली.

हाय कोर्ट सुप्रीम कोर्टाचे खोटे पेपर दाखवून जोशी वकील व वाकडे यांनी ग्रामस्थांना वेठीस धरत असताना पर्यटन संचालनालय पुणे त्यांना साथ देत होती परंतु आता त्या कागदाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शनिवारी पहाटे 6 ला दांडेघर गावची यात्रा असतानाच प्रशासन पाच जेसीबी दोन क्रेन घेऊन जागेवर पोहोचली. व कारवाईला सुरुवात केली. आणि या ठिकाणावर झालेली सर्व पत्र्याचे शेड, बांधकामे पडण्याचा सपाटा लावला.या अचानक कारवाईची बातमी भागात वणव्यासारखी पसरली व जल्लोष सुरु झाला.केदारेश्वरची आरती करून पेढे वाटत दांडेघर ग्रामस्थानी फटाके फोडून प्रशासनाचे आभार मानले.

सर्व्हे नं 10 वर कोणत्याही व्यवसायास परवानगी देऊ नये असा कलेक्टर सातारा यांचा आदेश प्राप्त झाला असल्याने ग्रामस्थ यांनी आपला पहिला विजय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button