पांचगणीभिलारविशेषशैक्षणिकसामाजिक

बिलिमोरीया हायस्कूलच्या ‘ *आरंभ* ‘ ; फेस्टिव्हलला दिली सुमारे 2000 लोकांनी भेट ; विनय काप्री यांनी दाखवलेली जादू ठरली आकर्षण

Oplus_131072

पांचगणी (टीम कृष्णकुंज नेटवर्क)
पांचगणी : पाचगणी येथील नामवंत निवासी शिक्षण संस्था असणाऱ्या बिल्लीमोरिया हायस्कूलने आयोजित केलेल्या व्यवहारिक ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी आयोजित केलेल्या ‘आरंभ २०२४ ‘- फेस्टिव्हलचा आज दुसरा दिवस आहे. आजपर्यंत २००० ते २२०० पालक, पर्यटक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद लुटला. आज झालेल्या कार्यक्रमात मानसिकता वादी कलाकार विनोद काप्री यांनी सर्वांचेच मनोरंजन केलेच पण आपली जादुई कलेचा आविष्कार चांगल्या पद्धतीने सादर केला. या कलाकाराने फक्त स्टेजवर कार्यक्रम सादर न करता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन वाहव्वा मिळवली. तर बिल्लीमोरीया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तू खरेदी साठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच चित्रकार मुकिम तांबोळी यांनी प्रत्यक्ष दर्शनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे सुधा बऱ्याच पालकांनी व पर्यटकांनी खरेदी केली. खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी दिसत होती.
आज महोत्सवाचा दुसरा दिवस असून उद्या समारोप होणार आहे. आज व काल परिसरातील नागरिक व पालकांनी गर्दी केल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली होती. या महोत्सवामुळे पांचगणी शहरात सुधा गर्दी दिसत होती. हे सर्व पालिका पांचगणी मध्ये वास्तव्यास राहिल्याने बाजारपेठेत गजबजाट जाणवत होता. विविध दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी दिसत होती. बिलिमोरीया च्या फेस्टीव्हल मुळे पांचगणी शहरातील व्यावसायिकांची सुधा आर्थिक उलाढाल झाल्याने व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शासकीय अधिकाऱ्यांबरोबर पालकांमध्ये असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या फेस्टीव्हलला हजेरी लावली.

बिलिमोरिया हायस्कूलने सुरू केलेल्या या महोत्सवामुळे बाजारपेठेतील लॉजिंग, हॉटेल्स, जाम जेली, खेळणी, स्वेटर, कपडे खरेदीसाठी या महोत्सवासाठी खास आलेल्या पालकांनी तसेच इतर पर्यटकांनी गर्दी केल्याने नक्कीच व्यवसायिकांची आर्थिक उलाढाल झाली यामुळे व्यवसायिक आनंदित झाले होते.

Oplus_131072

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button