वानवा लागल्याला दिसला जीवाची परवा न करता विझवू लागला वनवा
भरत जाधव व त्यांचा सहकार्य चे पर्यावरण प्रेमीकडून कौतुकाचा वर्षाव

पसरणी घाटातील विझवलेला वणवा.पाचगणी (टीम कृष्णकुंज न्युज) शनिवारी रात्री पसरणी घाटात साडेआठ सुमारास लागलेल्या वणवा विझविणाऱ्या दोन हातांना आठ हातांचे बळ मिळाल्याने वणवा बघता बघता दहा हातांनी वणवा विझला ही मात्र अंधाऱ्या रात्री डहाळ्या हाती घेवून विझविनाऱ्या दहा हातांची कमाल होती. या दहा हातांचे सद्या सर्वत्र कौतुक होतेय.
या बाबतची अधिक माहिती अशी की, पाचगणी – वाई रस्त्यावर पसरणी घाटात शनिवारी रात्री साडेआठ सुमारास नुकताच वनव्याने पेट घेतला होता. यावेळी आपली ड्युटी संपवून घराकडे जाणाऱ्या पाचगणी पोलिस स्टेशनला कार्यरत असणारे सातारा पोलिस गोपनीय यंत्रणेतील व्यसनमुक्ती समाज प्रबोधनकार भरत जाधव यांनी वणवा पहातच तत्परतेने गाडी थांबवून झाडांच्या डहाळ्या हाती घेत अंधाऱ्या रात्री वणवा विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना वणवा विझविताना पाहून रस्त्याने दुचाकी वरून जाणाऱ्या आदित्य जावळे , नरेंद्र चूनाडे , पाचगणी, प्रवीण काकडे , राहुल हागिर, रविवार पेठ वाई, यांनी हे दृश्य पाहून वणवा विझविण्यासाठी सरसावले.
: हा वणवा विझविण्यासाठी समाज प्रबोधनकार भरत जाधव व सहकाऱ्यांनी दाखविलेली तत्परता नक्कीच कौतुकस्पद आहे. याची प्रेरणा घेऊन अनेकांनी ही कृती अंगीकारली तर वनसंपदेच रक्षण नक्कीच होईल..
प्रशांत डोंगरे, पर्यावरणप्रेमी, वाई..
युवकांनी मदत केल्याने वणवा विझविण्याचे प्रयत्न सार्थकी लागले. दोन हातांच्या मदतीला आठ हात धावल्याने वणवा आटोक्यात आला. यामुळे पसरणी घाटातील वनसंपदा वणवा ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली याचे श्रेय या दहा हातांना जाते. यांनी जीवाची पर्वा न करता या वनव्यावर नियंत्रण मिळविल्याने आग आटोक्यात आणली गेली. याचे सर्वत्र पर्यावरण प्रेमी, आणि नागरिक यांच्याकडून कौतुक होत आहे
एरव्ही वणव्यात होरपनाळी वनसंपदा दिसत असूनही शेजारून निघून जाणारी लोक आपण पहातो.
मात्र येथे अंधाऱ्या रात्री आपला जीव धोक्यात घालून वणवा विझविनारी सुद्धा दुसऱ्या बाजूला आहेत. याचे मोठे अफ्रुफ वाटल्याशिवाय राहत नाही.. काडी टाकणारा टाकून जातो. त्यानंतर उद्भवणारी परिस्थितीची मात्र त्याला जाणीव नसते.
