पांचगणी

पांचगणीत थकबाकी धारकांच्या २९ मिळकती सील ; पांचगणी नगरपालिकेची मिळकत धारकांवर कारवाई

पाचगणी :(टीम कृष्णकुंज न्यूज) चालू आर्थिक वर्ष संपले असले तरीही नगरपरिषदेच्या मिळकत कराची थकबाकीची वसुली अद्यापि चालू ठेवण्यात आली असून ही कर वसुली मोहीम तीव्र स्वरूपात करण्यात आली आहे . मिळकत धारकांनी आपले मिळकत कराची थकबाकी तात्काळ नगरपरिषदेमध्ये भरणा करून मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा प्रसंग टाळावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे . पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदे मार्फत गेली सहा महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली सुरू असून या अंतर्गत एकुण २ ९ मिळकती सील करण्यात आल्या आहेत..
शासनाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना केवळ नवीन कामांसाठी निधी प्राप्त होतो . देखभाल दुरुस्ती करिता कुठलाही निधी नगरपरिषदांना प्राप्त होत नसून तो नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या स्वनिधितून करावा लागतो . त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरून आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button