महाबळेश्वर

शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

महाबळेश्वरमध्ये 4ऑगस्टला भव्य नागरी सत्काराचे आयोजन

महाबळेश्वर (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते, माजी जलसंपदा मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. शशिकांतजी शिंदे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या सन्मानार्थ महाबळेश्वर येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.ही निवड सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात असून, राज्यात पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी शशिकांत शिंदे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.भव्य नागरी सत्कार सोहळा
हा सत्कार सोहळा सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, हॉटेल ड्रीम लँड, महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. रोहितदादा पवार (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे) राहणार आहेत.श्री. सुनील माने – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)श्री. राजेंद्र शेलार – सरचिटणीस, सातारा जिल्हा काँग्रेस श्री. यशवंत घाडगे – जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याशिवाय तालुका व स्थानिक पातळीवरील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.श्री. सुभाष कारंडे, श्री. राजेश कुंभारदरे, श्री. आशिष चोरगे, श्री. संतोष आप्पा जाधव, श्री. विश्वनाथ दादा संकपाळ, श्री. किसन भिलारे, श्री. सचिन वागदरे, श्री. शंकर पवार, श्री. राजा भाऊ गुजर, सौ. राजश्री भिसे यांचा समावेश आहे.
संयुक्त आयोजन –
हा सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), महाबळेश्वर तालुका शिवसेना (उ.बा.ठा.) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.सत्काराच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण शशिकांत शिंदे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर महाबळेश्वर व परिसरातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक गतिमान व मजबूत होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.हा सोहळा महाबळेश्वरच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button