पांचगणी

घाटजाई देवी पालखी मिरवणूकीसाठी पांचगणी शहरातील– वाहतूक मार्गात बदल

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज) पाचगणी पोलिस ठाणे हददीत तसेच शहर, पाचगणी गावचे परीसरामध्ये एस टी स्टँड ते घाटजाई मंदिर परिसरामध्ये भव्य पालखी छबीना मिरवणूक कार्यक्रम होणार असल्यामुळे, दिनांक ०५ मार्च २०२४ ते ०६ मार्च २०२४ या कालावधीत सकाळी १० वाजता ते सायं ०४ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर कडून वाईकडे जाणारी वाहणे एस.टी स्टँड चौक पांचगणी मार्गे राहील प्लाझा-टेबल लॅण्ड कॉर्नर – अपना हॉटेल – भिमनगर –जुने पोलिस ठाणे ते मेन रोड अशी जातील.
वाईकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहणे डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान-चेसन रोड शॉलम हायस्कुल न्यु इरा मार्गे रश्मी चौक मेनरोड मार्गे जातील.
महाबळेश्वरहून वाई पुण्याकडे जाणारी अवजड वाहणे सकाळी 11.00 ते रात्री 12 पर्यंत संजीवन नाका मार्गे करहर,कुडाळ, पाचवड मार्गाने जातील.
महाबळेश्वरकडे जाणारी अवजड वाहणे पाचवड मार्गे कुडाळ, करहर, सजीवन नाका, महाबळेश्वर या मार्गे जातील.
वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button