भिलार

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे गावभेट दौरा उपक्रमाचा जननी कुंबळजाई मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ

पवार साहेबांची आणि जनतेची जी तुटलेली नाळ आहे ती जोडण्याचं काम या गावभेठी तून करणार

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज)
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा विचार गावोगावी, घरोघरी पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस गणेश दानवले यांच्या हस्ते आज महाबळेश्वर तालुक्यातील दानवली गावच्या जननी कुंबळजाई मंदिरात गावभेट दौरा उपक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.


यावेळी अभय लक्ष्मी सोसायटीचे संचालक सुधाकर देवघरे , राजगड साखर कारखान्याचे माजी अधिकारी सुभाष दानवले, संदीप शिंदे, उद्योजक व कृषितज्ज्ञ भीमरावशेठ दानवले, प्रशांत दानवले- पाटील , विकास दानवले, अक्षय दानवले , अजित दानवले, माजी सरपंच शांताराम दानवले, विकास दानवले, प्रदीप दानवले, जयवंत दानवले, संतोष दानवले, अमित दानवले, बापू दानवले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
आज सकाळी जननी कुंबळजाई मंदिरात श्रीफळ वाढवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस गणेश दानवले म्हणाले राष्ट्रवादी पक्षाच्या उलथापालथी नंतर मीडियाच्या माध्यमातून प्रपोगंडा केला गेला पक्षाचे कार्यकर्ते इकडे तिकडे गेले. आमदार मकरंद आबा हाच आमचा पक्ष अशी भूमिका घेतली पण इथे तस नाहीये कारण पवार साहेबांमुळे हे सगळे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. हा वटवृक्ष आहे त्याच्या आम्ही सर्वजण पारंब्या आहोत. जो सामान्य कार्यकर्ता आहे तो कुठेही गेलेला नाहीये. तो जागेवरती आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते चित्र मतदानातून स्पष्ट होणार आहे. असे सांगितले.

महाबळेश्वर तालुका हा शेतीवर आधारित आहे. येथील अनेक कुटुंबे उद्योग किंवा नोकरीसाठी इतरत्र स्थलांतरित झालेली आहेत. महाबळेश्वर हा पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी कृषी पर्यटन तसेच शेतीला पूरक असे उद्योग व्यवसाय केले जाऊ शकतात. त्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देण्याचं काम आपण पक्षाच्या माध्यमातून करूया. फळ प्रक्रिया सारखे उद्योग होऊ शकतात. वाई एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आले पाहिजेत. तरच इथल्या तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध होईल याच्याकडे आपला जोर असेल असेही गणेश दानवले यांनी सांगितले.

पवार साहेबांची आणि जनतेची जी तुटलेली नाळ आहे ती जोडण्याचं काम आपण गावभेट दौऱ्यातून करणार आहे. कार्यकर्ते आणि जनतेला पवार साहेबांच्या विचारांशी असणारी नाळ पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपण सगळा तालुका पिंजून काढणार आहे. गेल्या ५० – ६० वर्षापासून पवार साहेब आणि जनतेचे जे नातं आहे. ते नाते पुन्हा जोडण्यासाठी व मुख्य प्रवाहामध्ये सगळ्या कार्यकर्ते आणि जनतेला आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. असेही दानवले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button