टेबल लँडवरील ९० घोडे व्यावसायिकांची पांचगणी पोलिसांनी केली तपासणी

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)पांचगणी मधील टेबल लँड हे आशियातील सर्वात लांब पर्वतीय पठार असून याबरोबरच येथे असणारी घोडे सवारी ही पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. योग्य नियंत्रण आणि दबाव नसल्याने ही घोडे सवारी करताना होत असणारे छोटे मोठे अपघात पर्यटकांच्या जीवावर बेतत आहेत. त्यामुळे पाचगणी पोलीस ठाण्याने याबाबत शाश्वत पावले उचलली असून आज टेबल लँड वरील ९० घोडे व व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की पाचगणी येथील टेबल लँड पठारावर अनेक उच्चभ्रू पर्यटक भ्रमंती करण्यासाठी येत असतात. यावेळी घोडा गाडीचालक, यांच्या कुचराईने अनेकदा अपघात ग्रस्त परिस्थिला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून तक्रारी येत असल्याने किरकोळ कारणानी पांचगणीचे नाव बदनाम होऊ नये यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी काही महिन्यापूर्वी पालिकेला बरोबर घेऊन नियम घालून दिले होते.
यामध्ये परवानाधारक घोडे मालकांचे व त्यांच्या मदतनीसाचे व्हिरीफिकेशन बंधनकारक , परवानाधारक घोड्यांनाच व्यवसाय करता येणार., ठरवलेले दर हे बोर्डावर लावण्यात येतील व त्यावर पोलिस स्टेशन व पालिकेचा नंबर टाकण्यात येतील., हे बोर्ड इंग्रजी व मराठीत लावण्यात येतील. , नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल., पालिकेने तयार करून दिलेले दराप्रमाणे या व्यवसायिकानी पर्यटकांकडून शुल्क घ्यावी., घालून दिलेले नियम पाळून घोडे व्यासायिकांनी आपला व्यवसाय करणे बंधनकारक. असे नियम या व्यावसायिकांना लागू करण्यात आले.
यानुसार आज पांचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी आज अचानक सर्व यंत्रणा घेऊन टेबल लँड गाठले. विशेष ड्राईव्ह घेऊन गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक व विना परवाना इसम चेक करण्यात आले..१७१ पैकी ९० लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणीहीं दोषी आढळले नाही. यावेळी टेबल लँड पासून जाताना येताना वाहतुकीच्या नियमाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यापुढेही ही कारवाई चालू राहील असे सपोनी दिलीप.पवार यांनी सांगितले. तसेच टेबल लँड येथील घोडे व्यवसायिक मालक-चालक यांची यापूर्वी चारित्र्य पडताळणी करण्यात आलेली होती. यावर आज टेबलला जाताना ट्राफिक राहणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात आले आहेत. बाजारपेठेतून येताना व जाताना अनेक व्यावसायिक घोडे सोडून देतात तसेच ऐक व्यक्ती दोन घोडे पकडून नेतात त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. व्यसन करून घोडा चालवणे, मनाला येईल त्या भावात पैसे घेणे, वाहतुकीला अडथळा होईल असे घोडे हाकणे असे गैर प्रकार आढळल्यास परवाने रद्द करून कडक कारवाई करण्यात येईल.
