पाचगणी नगरपालिकेने उभारलेल्या सोलर ट्री कोसळल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात


पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेने शहरातील असणारे पॉईंट कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभी कारण करण्यात आले टेबल लँड, पारसी पॉईंट ,सिडणे पॉईंट या ठिकाणी नगरपालिकेने सुशोभित करण्याचे काम हाती घेतले. पाचगणी शहरातील तीनही पॉईंट सुशोभीकरण करून सुंदर करण्यात आले. पण या पॉईंटवर उभारण्यात आलेल्या सोलर ट्री उन्मळून पडला या कामात ठेकेदार याच्या हलगर्जीपणा यामुळेच हा सोलर ट्री उन्मळून पडला यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत .पाचगणी शहर हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची वर्षभर चांगलीच रेलचेल असते. या अनुषंगाने पाचगणी नगरपालिकेने नगरपालिके हद्दीत असलेल्या सर्व पॉईंट सुशोभीकरण व विकसित करण्याचे काम हाती घेतले होते .

याठिकाणी पॅगोडा, झुलता पूल, गॅलरी असे अनेक प्रकारची कामे करण्यात आले होती. गेल्या सहा महिन्यापूर्वी या पॉईंट चे सुशोभीकरण करण्यात आले पण ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सोलर अचानकपणे पडल्याने नगरपालिकेने केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेले असे चित्र सध्या दिसत आहे. संबंधित ठेकेदार याने निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याने हे सोलर ट्री पडल्याने मोठे नुकसान झाले यामध्ये कोणती ही जीवितहानी झाली नाही . यामुळे मोठा अनर्थ टळला
या सुशोभीकरणाच्या टेंडर वॉल्ट्रोन या कंपनी ला देण्यात आले होते या कंपनी ने या वातावरणातील असणाऱ्या हवेचा दाब याचा विचार न केल्याने व या सोलर ट्रीचा पाया कमकुवत राहिल्याने हा सोलर ट्री पडल्याने आता या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सिडनी पॉइंट व टेबललँड उंचावर असल्याने याठिकाणी हवेचा जोर जास्त असतो .तसेच सध्या पावसाचे प्रमाण पण खूप आहे. त्यात वाराही सोसाट्याच्या असल्याने व हे सोलर युनिट पडल्याने संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई केली जाईल
निखिल जाधव प्रशासक तथा मुख्याधिकारी पाचगणी

