श्री स्वामी समर्थ पालखी

पांचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज) श्री क्षेत्र अक्कलकोट( निवासी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळा परिक्रमेचे बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी पाचगणी शहरात आगमन होत असून पादुका दर्शनाचा स्वामी भक्तांनी लाभ घेण्याचे पालखी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे..!
श्री. स्वामी समर्थ परिक्रमा पादुका पालखी सोहळा प्रती वर्षी मागील २२ वर्षापासून या परिक्रमा सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या वर्षी स्वामी समर्थ पादुकांचे आगमण सकाळी १० वा. पाचगणी बसस्थानक परिसरात होणार आहे.पादुका पुजन झाल्यावर ढोल ताशांच्या गजरात शहरातून पालखी पादुका मिरवणूक काढण्यात आल्यावर दु.१२.०० वा शांती कॉटेज येथे आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यापादुका पालखी सोहळ्यास भावीक भक्तांनीमोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान मेहुल पुरोहित, प्रमोद शिंदे, संदेश बुटाला, सुनील उंबरकर, हिमांशू पुरोहित आदी मंडळीनी केले आहे.
