भिलार
श्री क्षेत्र अक्कलकोट (निवासी) श्री स्वामी समर्थ पादुका परिक्रमा गुरुवारी भिलार मध्ये स्वामी भक्तांनी पादुका दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन..!! #shri swami samarth#

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज) श्री क्षेत्र अक्कलकोट( निवासी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळा परिक्रमेचे गुरुवार १५फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० वाजता भिलार गावात आगमन होत असून पादुका दर्शनाचा स्वामी भक्तांनी लाभ घेण्याचे पालखी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे..!
श्री. स्वामी समर्थ परिक्रमा पादुका पालखी सोहळा प्रती वर्षी मागील ८ वर्षापासून या परिक्रमा सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या वर्षी स्वामी समर्थ पादुकांचे आगमण सकाळी ७:३० वा. भिलार चौकात, परिसरात होणार आहे.
पादुका पुजन झाल्यावर आरती तीर्थ प्रसादाचे आयोजन केले आहे. यापादुका पालखी सोहळ्यास भावीक भक्तांनीमोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान पालखी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
