अतिवेगवान ६०० मीटर धावणे बाल क्रीडा स्पर्धेत ध्रुव गोळे जिल्ह्यात अव्वल..
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव..!!

पाचगणी: (टीम कृष्णकुंज न्युज) रामवाडी, तालुका जावळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी धुर्व जीवन गोळे याने स्व यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा जिल्हास्तरीय ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सातारा येथे छत्रपती शाहू स्टेडियवर स्व. यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या यामध्ये रामवाडी, येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी धुर्व जीवन गोळे हा धावणे या क्रीडा प्रकारात अती वेगवान म्हणून ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ध्रुव गोळे हा जिल्ह्यात प्रथम आला आहे.
त्याच्या या यशा बद्दल शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा शबनम मुजावर , मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद सातारा अविनाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा महादेव घुले, गटशिक्षणाधिकारी मा श्री. संजय धुमाळ साहेब मा.श्री.कर्णे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी,
मा. श्री. दळवीसाहेब केंद्रप्रमुख केंद्र हुमगाव
द्रोणाचार्य अकॅडमीचे प्रशिक्षक अमोल चव्हाण, रामवाडी प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका सिमा घाडगे, सहशिक्षिका महाजनी मॅडम, रामवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, तसेच यवा तरुणांकडून
अभिनंदन होत आहे.
