टेबल लॅंन्ड पठारावर वाहन तळासाठी १ कोटी १३ लाखाचा निधी ; आ.मकरंद पाटील व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कामाचा झाला शुभारंभ

पाचगणी(टीम कृष्णकुंजन्युज) : टेबल लॅंन्ड पठारावर वाहनतळ विकसित करणेसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी १३ लाखाचा निधी उपलब्ध झाला असून या माध्यमातून नगरपालिका पर्यटकांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करू शकेल असा विश्वास आमदार मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केला.

पर्यटन नगरी पाचगणी येथील टेबल लॅंन्ड पठारावर प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२३-२४ मधून वाहनतळ विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वाई-खंडाळा- महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे,पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव,माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, नानासाहेब कासुर्डे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, माजी नगरसेवक प्रवीण बोधे, गँब्रियल फर्नांडिस, शरद कासूर्डे, समाजसेवक प्रकाश गोळे, जावली बँकेचे संचालक अजित कळंबे, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पारटे, टेबल लॅंन्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, दिलिप कांबळे,हेन्री जोसेफ, डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बगाडे , मिथुन नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी माहिती देताना आपण शहरातील पर्यटन स्थळांच्या विकासाच्या माध्यमातून या वाहन तळाच्या निर्मितीनंतर सुमारे ११५ वाहनांची सोय होणार आहे. तर तलावाच्या सुशिभोकरणाचा कामाची माहिती यावेळी दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पठारावरील तलावाच्या विकास कामाचा आढावा घेतला. घोडे व घोडागाडी व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पहिल्यांदा ही सर्व कामे होऊ द्यात त्यानंतर तुमच्या घोडे ट्रॅक बाबत आपण सकारात्मकपणे प्राधान्याने विचार करू असे सांगितले.
यावेळी कोनशिलेचे उद्घाटन व श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच टेबल लॅंन्ड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील व जिल्हाधिकारी याचा पुषापगुच्छ व शाल देवून सत्कार केला.
टेबल लॅंन्ड तळ्याच्या शेजारी असणारे जुने विजेचे पोल पाहून आ. पाटील यांनी मुख्याधिकारी यांना नव्या पद्धतीचे पोल बसवून या परिसराची शोभा वाढवावी. अशी कान पीचकी दिली.
तळ्याच्या स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी डूडी व आमदार यांनी मुख्याधिकारी यांना या तळायची स्वच्छता ठेवणे आपले कर्तव्य आहे तर व्यापारी असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांना सुधा सांगितले आपण ज्या ठिकाणी रोजी रोटी मिळवतो त्या ठिकाणची स्वच्छ ता करण्याची जबाबदारी आपलीही असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी येणार म्हणून पालिकेच्या ठेकेदाराने टेबल लॅंन्ड रस्त्यावरील खड्डे मातीने मुजवण्याचे काम सुरू केले पण त्या अगोदरच जिल्हाधिकारी व आमदार आल्याने खड्डे मुजवण्याचा फार्स देखावाच झाल्याची चर्चा सुरू होती.
पांचगणीत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फुलपाखरू उद्यान उभारण्याचा आपला संकल्प असून या माध्यमातून शहरात पर्यटक जास्तीत जास्त वेळ रेंगाळतील असे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास मुख्याधिकारी यांनी आणून दिले.
