पांचगणी

पाचगणी नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत “सुपर स्वच्छ लीग” मध्ये बाजी

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)पाचगणी नगरपरिषदेने सन २०२४ स्वच्छ सर्वेक्षणात शहर स्वच्छतेत सातत्य व नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश करत केंद्र सरकार स्वच्छसर्वेक्षणात नेहमीच अव्वल कामगिरी करणाऱ्या पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने यावेळीसुद्धा स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत “सुपर स्वच्छ लीग” मध्ये सुद्धा बाजी मारली असून याचा पुरस्कार वितरण सोहळा हा दि. १७ जुलै रोजी नवी दिल्ली विज्ञान भवन येथे संपन्न होणार आहे.स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांसाठी केंद्र सरकारने यावर्षी पासून सुपर स्वच्छ लीग चे आयोजन केले होते. यात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांसाठी स्वच्छतेच्या बाबतीत अजून काही महत्वाचे नियम व अटी यांचा समावेश करत सदरची स्पर्धा जास्त अवघड केली होती.स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’ ही एक नवी आणि महत्त्वपूर्ण श्रेणी समाविष्ट करण्यात आली होती. मागील तीन वर्षे (२०२१, २०२२, २०२३) स्वच्छतेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक शहरांसाठी ही श्रेणी सुरू करण्यात आली. २०,००० पेक्षा कमी लोकसंख्या गटातील देशभरातील शहरांमध्ये पांचगणी ने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये आपले स्थान टिकवण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ८५% गुण मिळवणे आवश्यक होते आणि पांचगणी शहराने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपले अग्रस्थान प्राप्त केले आहे.
सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयास आणि पर्यटन स्थळ स्वच्छ व नीटनिटके ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने मुख्याधिकारी श्री पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेत सुद्धा बाजी मारली असून सदर पुरस्कार सोहळा हा दिनांक १७ जुलै रोजी नवी दिल्ली विज्ञान भवन येथे पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button