भिलार

पांगारी गावची मुख्य प्रवेशद्वार कमान धोकादायक

कमान दुरुस्त करण्याची ग्रामस्थ नागरिकांकडून मागणी

पांगारी ता. महाबळेश्वर मुख्य कमान धोकादायक झाली आहे.

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क )
पांगारी (तालुका महाबळेश्वर) गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभी असलेली स्वागत कमान काही दिवसापूर्वी वाहनाच्या धडकेत ही एका बाजूला कलली असून ही धोकादायक झाली असून मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाले आहे.
या ठिकाणावरून रोज शाळकरी मुले, ग्रामस्थ तसेच दु चाकी चारचाकी वाहनांची सतत या- जा असते तसेच ही कमान पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर असल्याने तसेच कमान कधीही पडू शकतो अशी भीती निर्माण कमानीचा लोखंडी ढाचा जर दुर्दैवाने कोसळला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसापूर्वी या कमानीला वाहनाची धडक दिल्याने ही कमान एका बाजूला झुकली आहे तसेच ही कमान एका बाजूला पूर्ण तुटली असून ही एका नटबोल्ड वर टिकली आहे ती कधी तुटून खाली पडू शकते त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या शाळकरी मुले ग्रामस्थ ,पर्यटक यांच्या जीवितास दोखा निर्माण झाला आहे. सध्या पावसाचे दिवस असून याठिकाणी एकदा वाऱ्याच्या दाबाने कमान कधी खाली पडून परस्थिती अधिकच गंभीर बनू शकते त्यामुळे ग्रामपंचायतीने या कडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कमान दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी यांच्याकडून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button